“MH-46-CX मालिका सुरू होणार – आकर्षक व पसंतीच्या वाहन क्रमांकासाठी अर्ज मागविण्यात येणार”
संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
९०११९९३३३
पनवेल: पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयात सध्या कार्यरत असलेली “MH-46-CW” मालिका संपुष्टात येत असून, त्यानंतर “MH-46-CX” ही नवी मालिका सुरू करण्यात येणार आहे. या मालिकेसाठी आकर्षक व पसंतीचे वाहन नोंदणी क्रमांक आरक्षित करण्यासाठी इच्छुक वाहन धारकांकडून अर्ज मागविण्यात येणार आहेत.
यासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २२ जानेवारी २०२५ आहे. अर्जदारांनी विहीत शुल्काचा डीडी (Demand Draft) सोबत सादर करणे आवश्यक आहे. अर्ज एका क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त आल्यास, २३ जानेवारी २०२५ रोजी लिलाव प्रक्रिया पार पडेल. लिलावासाठी अर्जदारांनी ऐच्छिक रकमेचा वेगळा डीडी बंद लिफाफ्यात सादर करावा.
लिलावासाठी ऐच्छिक रकमेचा डीडी: २३ जानेवारी २०२५ दुपारी १ वाजेपर्यंत
लिलाव प्रक्रिया: २३ जानेवारी २०२५ दुपारी ४ वाजता , लिलावादरम्यान ज्या अर्जदाराचा डीडी सर्वाधिक असेल, त्या अर्जदाराला पसंतीचा क्रमांक देण्यात येईल. आरक्षित क्रमांक फक्त १८० दिवसांसाठी वैध राहील. या कालावधीत वाहनाची नोंदणी न केल्यास, तो क्रमांक अनारक्षित होईल. आकर्षक व पसंतीच्या क्रमांकांची नोंदणी व लिलाव प्रक्रियेसाठी अधिक माहिती पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयात उपलब्ध आहे.
– सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल.