रस्ता सुरक्षा सप्ताह दिनानिमित्त रॅलीचे आयोजन

25
रस्ता सुरक्षा सप्ताह दिनानिमित्त रॅलीचे आयोजन

रस्ता सुरक्षा सप्ताह दिनानिमित्त रॅलीचे आयोजन

रस्ता सुरक्षा सप्ताह दिनानिमित्त रॅलीचे आयोजन

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 20 जानेवारी
रस्ता सुरक्षा सप्ताह निमीत्य जिल्हयात १ जानेवारी पासुन वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहे. पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतुक नियंत्रण शाखा, चंद्रपुर व नेहरू युवा केंद्र, चंद्रपुर यांच्या संयुक्त विद्यमाने वाहतुक नियंमांचे महत्व व मोटार वाहन कायद्याविषयी नागरीकांमध्ये जनजागृती व्हावी याकरीता सोमवार, २० जानेवारी रोजी शालेय विद्यार्थी व पोलीस कर्मचारी यांची वाहतुक नियमनाविषयी जनजागृत्ती रॅली आयोजीत करण्यात आली.

जनजागृती रॅली ही वाहतुक नियंत्रण शाखा, चंद्रपुर ते बस स्टॉप. परत वाहतुक नियंत्रण शाखा, चंद्रपुर पर्यंत काढण्यात आली. या जनजागृत्ती रॅली मध्ये सरदार पटेल महाविद्यालय, राजीव गांधी कॉलेज व इतर शाळेचे विद्यार्थी संबंधित शाळेचे शिक्षक तसेच प्रविणकुमार पाटील, पोलीस निरिक्षक, वाहतुक नियंत्रण शाखा, चंद्रपुर, प्रविण सोनोने, सहायक पोलीस निरिक्षक, वा.नि.शा. ॲड. देवा पाचभाई व इतर नेहरू युवा केंद्राचे पदाधिकारी व वाहतुक पोलीस अंमलदार हे सहभागी झाले होते.
तरी या जनजागृत्ती निमित्ताने वाहतुक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. असे आवाहन पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी केले.