बजाज चंद्रपूर तंत्रनिकेतनचा युवा महोत्सव २०२५ सोहळा संपन्न
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
चंद्रपूर : 20 जानेवारी
सर्वोदय महिला मंडळ द्वारा संचालित बजाज चंद्रपूर तंत्रनिकेतनच्या वतीने १६ ते १८ जानेवारी रोजी युवा महोत्सव २०२५ चे आयोजन करण्यात आले होते. शनिवार, १८ जानेवारी रोजी प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात समारोपीय कार्यक्रमात दुपारी ३.३० वाजता सर्वोदय महिला मंडळाच्या अध्यक्ष नील सी. बजाज यांच्या अध्यक्षतेखाली बक्षिस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता.
या युवा महोत्सवामध्ये पारंपारिक वेशभूषा स्पर्धा, फॅशन शो, नृत्य स्पर्धा, बुद्धिबळ, कॅरम, बॅडमिंटन, स्लो सायकलिंग, बॉक्स क्रिकेट, क्रिकेट, पोस्टर, ग्रिटिंग, रांगोळी, फ्लोवर, कराओके सिंगिंग, आंनद मेळावा, अश्या एकूण १५ विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील सर्व विजेत्या व उपविजेत्या स्पर्धकांना तसेच विविध उपक्रमात प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमात पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. माता सरस्वती व संस्थेच्या प्रेरणास्त्रोत यशोधरा बजाज यांच्या प्रतिमेला वंदन करून व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात झाली.
कार्यक्रमाच्या सुरवातीला संस्थेचे प्राचार्य विजय कोयाळ यांनी आपले प्रास्ताविक भाषण केले, संस्थेचे मुख्य कार्यपालन अधिकारी भरत बजाज यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक उपक्रमासोबतच सांस्कृतिक व क्रिडाविषयक उपक्रमातही सहभागी होऊन त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी असे उपक्रम संस्थेत होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन
केले. संस्थेच्या सचिव ममता बजाज यांनीही सांस्कृतिक उपक्रमाचे कौतुक कार्यक्रमाची सुरवात झाली.
संचालन प्रा. पि. आर. मालखेडे यांनी केले. व्यासपीठावर उपप्राचार्य दिनेश चौधरी, विभाग प्रमुख प्रा. राजेश उपगन्लावार विद्यार्थी प्रतिनिधी ओंकार भानारकर व विद्यार्थिनी प्रतिनिधी कु. प्रेमश्री घाटे उपस्थित होते. कार्यक्रमाला प्राध्यापक वृंद शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व पालक तसेच निमंत्रित बहुसंखेने उपस्थित होते. या युवा महोत्सवाअंतर्गत आयोजित विविध कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हा महोत्सव यशस्वी करण्यास बजाज चंद्रपूर तंत्रनिकेतनचे सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.