रेल्वेच्या धडकेत वाघ ठार

38
रेल्वेच्या धडकेत वाघ ठार

रेल्वेच्या धडकेत वाघ ठार

रेल्वेच्या धडकेत वाघ ठार
जितेंद्र नागदेवते
सिंदेवाही प्रतिनिधी
8806689909 

सिंदेवाही :- ब्रम्हपूरी वनविभाग, सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील कारगाटा विर कक्ष क्र 1338 मध्ये चांदाफोर्ट-गोंदिया रेल्वे गाडी क्र. 07051 ने आज दिनांक 19.01.2026 रोजी सकाळी 6ते 6.30 वाजता चे दरम्यान रेल्वेलाईन खेल क्र. 1168/2 ते 11688 चे दरम्यान रेल्वेगाडीच्या धडकेत मादी वाघचा मृत्यु झाला. मृत्यु वाघ ही मादी असून अंदाजे वय 12 ते 15 महिने आहे. घटनास्थळी मृत वाघाचे सर्व अवयव साबुत होते.

घटनास्थळी राकेश सेपट उपवनसंरक्षक ब्रह्मपुरी वनविभाग. एम. बी. चोपडे से. व. से. ब्रह्मपुरी वनविभाग विशाल सालकर सिंदेवाही बंडू धोत्रे N.T.C.A. प्रतिनिधी आणि मुकेश भांडककर प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव याचे प्रतिनिधी, श्री यश कायरकर स्व्यॉब नेचर केअर फांउडेशर श्री राकेश यांचे उपस्थितीत घटना स्थळाचा पंचनाचा केला. शालीनी लोंढे पशुधन विकास अधिकारी श् बजरंग सावरे पशुधन विकास अधिकारी पेटगांव यांनी मध्यवर्ती काष्ठ भांडार सिंदेवाही येथे शवविच्छेदन करुन DNA. विश्लेषण नमुने घेतले. शवविच्छेदनाची कार्यवाही करून मृत वाघास दहन करण्यात आले.
आर. व्ही. धनविजय वनरक्षक यांनी नी प्राथमिक गुन्हा क्र. 09117/227918 दिनांक 19-1-2025 अन्वये गुन्हा नोंदविला पुढील तपास राकेश सेपट उपवनसंरक्षक ब्रह्मपुरी यांचे मार्गदर्शनाखाली एम.बी चोपडे से. व.स. ब्रम्हपुरी विशाल सालकर व.प-अ- सिंदेवाही नितिन गडपायले क्षेत्र सहाय्यक सिंदेवाही हे करित आहेत.