घुग्घुस पोलीस ठाण्यात हळदी-कुंकू कार्यक्रम

27

घुग्घुस पोलीस ठाण्यात हळदी-कुंकू कार्यक्रम

घुग्घुस पोलीस ठाण्यात हळदी-कुंकू कार्यक्रम

हळदी-कुंकू कार्यक्रम हा सौभाग्याचे लेणे: ठाणेदार श्याम सोनटक्के

साहिल सैय्यद /प्रतिनिधि
📲9307948197

घुग्घुस: येथील पोलीस ठाण्यात मंगळवार, २१ जानेवारीला हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष ठाणेदार श्याम सोनटक्के, सहायक पोलीस निरीक्षक सचिन तायवाडे, पाटील, अनभुले यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

मनोगत व्यक्त करतांना ठाणेदार श्याम सोनटक्के म्हणाले, हळदी-कुंकूवाचा कार्यक्रम हा सौभाग्याचे लेणे असतो असे कार्यक्रम व्हायला पाहिजे हळदी-कुंकू कार्यक्रमाच्या निमित्त सर्वांना मी शुभेच्छा देतो.

उपस्थित महिलांना तिळगुळ वाटप करण्यात आले तसेच उखाणे म्हणण्यात आले.

यावेळी महिला पोलीस रंजना नैताम, वर्षा बावणे, समीक्षा भोंगळे, प्रणाली लोंढे, अश्विनी मालेकर, कमल राठोड, सिमा चटारे महिला दक्षता समितीच्या अमीना बेगम, सरस्वती पाटील, दुर्गा पाटील, लक्ष्मी चांदेकर, आबेदा पठाण पोलीस पाटील पूजा फुलझेले, लता घाटे, ललिता भोयर, शर्मिला नगराळे, विद्या गोहने, अष्टविना वाढई व मोठया संख्येत महिला उपस्थित होत्या.