जमिनीच्या वादातून केला खून.

34

जमिनीच्या वादातून केला खून.

जमिनीच्या वादातून केला खून.

त्रिशा राऊत नागपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
9096817953

नागपूर: सक्करदऱ्यातील सेवादलनगरात जमीन खरेदीच्या वादातून अमोल पंचम बहादुरे यांचा बुधवारी रात्री विटांनी ठेचून अमानुष खून करण्यात आला. या खुनात सहभागी असलेला दिनेश गायकी हा ‘पिंटू शिर्के’ खून प्रकरणात जन्मठेपेचा कैदी आहे.तो नुकताच पॅरोलवर बाहेर आला होता. खुनातील सर्वच आरोपी भद्रे गॅंगचे सदस्य असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान पोलिसांनी सर्वच आरोपींना अटक केली असून त्यांची २६ जानेवारीपर्यत पोलिस कोठडी मिळविली आहे.
उमरेड येथील मटकाझरी तालुक्यातील जमीन खरेदी करण्याच्या वादातून शुभम आणि त्याच्या साथीदाराने बुधवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास खून केला होता. पोलिसांनी दिनेश गायकी याला सुरुवातीलाच अटक केली होती. दरम्यान शुभम याच्यासह शुभम हटवार (वय ३०),अतीत, लाला, आकाश भगत, प्रवीण ढेंगे यांनाही पोलिसांनी अटक केली.

यावेळी आरोपींचे रेकॉर्ड तपासले असता, त्यातील दिनेश गायकी हा २००२ मध्ये जमिनीच्या वादातून झालेल्या पिंटू शिर्के याच्या खुनाच्या आरोपीखाली कारागृहात जन्मठेप भोगत असल्याची माहिती समोर आली. काही दिवसांपूर्वीच तो ‘पॅरोल’वर आला होता. शुभम त्याचा साथीदार असल्याने प्रॉपर्टीचा वाद सोडविण्यासाठी तो त्याच्यासोबत गेला होता.
मात्र, यावेळी वाद वाढल्याने त्याने अमोलचा गेम केला. पोलिसांनी सर्वच आरोपींना अटक करीत, शुक्रवारी प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यासमोर सादर केल्यावर त्यांची २६ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली. अमोलही गुन्हेगारी जगताशी संंबंधित असल्याने त्याच्या खुनामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. मारणारे एका मोठ्या गुन्हेगारी गॅंगशी निगडीत असल्याने येत्या काळात परिसरात गॅंगवॉर भडकण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अमोलवरही २०१२ मध्ये तिरंगा चौकात लॉटरीचे दुकान चालविणाऱ्या भाजयुमोचा कार्यकर्ता मंजू काशीकर याच्या हत्येत सहभागी असल्याचा गुन्हा दाखल होता. तोही प्रॉपर्टी डिलिंगचे काम करायचा. त्यातूनच त्याचा खून झाल्याची माहिती समोर आली होती.