सुस्थितीतील जिल्हा परिषदेच्या इमारत रिकामी करून पैशाचा अपव्यय
माजी आमदार पंडित पाटील यांचा आरोप
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग :- रायगड जिल्हा परिषदेच्या सुस्थितीतील इमारत रिकामी करून जनतेच्या पैशाचा अपव्यय कशासाठी केला आहे. घाईघाईचा निर्णय घेत इमारत खाली केली असा आरोप माजी आमदार पंडित पाटील यांनी केला आहे.
जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने किरण पाटील हे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना जिल्हा परिषदेची सुस्थिती असणारी इमारत जाणीवपूर्वक रिकामी गेली. आज त्याला एक दोन वर्ष झाली आहे अद्याप पर्यंत ती धूळ खात पडलेली आहे.
आणि त्या बिल्डिंगच्या समोर असणारी सिविल हॉस्पिटल जिथे स्लॅब पडून अनेक लोकांना इजा झालेली आहे त्या संदर्भात शासन काहीच कारवाई करत नाही. मग जिल्हा परिषदेची इमारत स्वर्गीय प्रभाकर पाटील यांनी यांनी बांधली तिथे त्यांचे स्मारक होते, यांच्या पोटात का दुखले ते काही मला समजले नाही असा सवाल करत जिल्हा परिषदेने कोट्यवधी रुपये खर्च करून कुंटे बागेत इमारती बांधल्यात मला वायफळ खर्च कशासाठी केला असा सवाल माजी आमदार पंडित पाटील यांनी केला आहे.
ते म्हणाले की, नव्याने इमारत तुम्ही बांधत असताना जिल्हा परिषद जिल्हा प्रशासनाने सार्वजनिक जनतेच्या पैशाचा अपव्यय करण्याचे कारण काय आणि अजून त्या बिल्डिंगला काही झालं नाही त्याचा टेंडर होणार नाही इमारत धुळ पडत ठेवायचं कारण काय असा प्रश्न माजी आमदार पंडित पाटील यांनी केला आहे .
राज्य सरकारने आणि जिल्हा परिषदेने घाईघाईचा निर्णय घेत इमारत खाली केली असे आरोप ही पंडित पाटील यांनी केला आहे.
बिल्डिंग खाली केल्यानंतर नव्याने निविदा काढणे आवश्यक होते राज्य सरकारने निवडणुकीपूर्वी कोट्यवधी रुपयाचा निधी मंजूर केला होता फक्त समावेश का केला नाही .
जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने जनतेला याचा खुलासा केला जावा अशी अपेक्षा ही त्यांनी व्यक्त केली आहे. रायगड जिल्हा परिषदेची शिवतीर्थ इमारत ही एक खिडकी योजना होती एका इमारतीत सर्व विभागाचे कार्यालय होते त्यामुळे लोकांची गैरसोय होत नव्हती मात्र आता विविध ठिकाणी कार्यालय असल्याने कामकाजामध्ये देखील नियंत्रण ठेवता येत नाही. लोकांनाही त्याचा मनस्ताप होतो हे करण्याचे कारण काय, कारण इमारत खाली करून दीड दोन वर्षाचा कालावधी लोटला आहे मग या संदर्भात जिल्हा परिषद प्रशासन का कारवाई करत नाही . आता नव्याने इमारत बांधण्याचे काम कधी सुरू होणार याची माहिती जनतेला द्यावी अशी मागणी पंडित पाटील यांनी केली आहे.
बॉक्स
आताच्या इस्टिमेट चालू आहे त्याला एकही रुपयाचा निधी मंजूर नाही. रायगड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एम एम आर डी ए मध्ये कोट्यवधी रुपयांच्या प्रशासकीय मान्यता देऊन काम चालू आहे.
पण त्यातला एकही रुपया आलेला नाही त्यामुळे ठेकेदारांवर आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. असे असताना यांनी दोन इमारती बंद केल्या एक जुनी पंचायत समितीचे ऑफिस होत होती आणि जिल्हा परिषदेची मुख्य इमारत याचे एस्टिमेट 21/ 22 च्या नुसार करत आहे.
याला अजून इस्टिमेट नाही अजून त्याला निधी नाही आता मी इस्टिम झाल्यानंतर पुन्हा रिवाईज इस्टिमेट करावे लागेल त्यामुळे इस्टिमेट देखील फेल्युअर आहे 77 कोटी मध्ये दोन्ही इमारती होऊ शकत नाहीत म्हणजेच चुकीच्या पद्धतीने इस्टिमेट करायचं आणि काम करताना वेळ वाढवायचा या सगळ्या गोष्टी करण्याचे कारण काय ?
31 मार्चला फक्त 52 दिवस बाकी आहेत अजूनही जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडे एकही रुपयाचा निधी नाही जिल्हा नियोजन मंडळाचा निधी नाही ?
एम एम आर डी ए चा निधी नाही राज्य शासनाने हातपाय पाहून अंथरूण पसरले पाहिजे असा सल्लाही पंडित पाटील यांनी शासनाला दिला आहे.