जुन्या भांडणातून चार आरोपींनी केला युवकावर शस्त्राने वार

30

जुन्या भांडणातून चार आरोपींनी केला युवकावर शस्त्राने वार

जुन्या भांडणातून चार आरोपींनी केला युवकावर शस्त्राने वार

आणि शेवटी विटानी ठेचून   केली हत्या 

त्रिशा राऊत नागपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
मो 9096817953

नागपूर : नागपूर येथील पारडी पोलिस स्टेशन परिसरात शनिवारी (ता.२५) सायंकाळी जुन्या भांडणातून चार आरोपींनी युवकावर शस्त्राने वार करण्यासोबतच, विटांनी ठेचून त्याची हत्या केली. युवक खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी होता.सुडभावनेतून आरोपींनी त्याचा ‘गेम’ केल्याची चर्चा परिसरात आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हर्ष राजू शेंडे (वय २४) असे मृत युवकाचे नाव असून तो हिवरीनगर येथील ब्रह्मानंद कॉलनीचा रहिवासी होता. आरोपींमध्ये सौरभ बोरकर, दुर्गेश लारोकर आणि त्यांच्या दोन साथीदारांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१८ मध्ये झालेल्या अमोल हुमणे हत्याकांडात हर्ष हा आरोपी होता. त्यावेळी अल्पवयीन असल्याचा फायदा मिळाला आणि तो या प्रकरणातून मुक्त झाला.
अमोलचे मित्र सौरभ आणि दुर्गेश हे तेव्हापासून त्याचे कट्टर वैरी झाले होते. २०२१ मध्येही सौरभचा हर्षशी वाद झाला होता. तेव्हापासून दोघांमध्ये स्पर्धा सुरू होती. शनिवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास हर्ष प्रजापतीनगर मेट्रो स्टेशनजवळून चंद्रनगरकडे जात होता. यावेळी आरोपींनी त्याला घेरले. चौघांनीही त्याच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला.सोबतच विटांनीही ठेचले. हर्ष जागीच रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला आणि आरोपी पळून गेले. स्थानिक नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली.
पारडीच्या विशेष पथकासह गुन्हे शाखेचे पथक आरोपींचा शोध घेण्यात व्यस्त आहे. २ आरोपींची नावे निश्चित झाली असून इतर २ जणांची नावे निश्चित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांकडून मेट्रो स्टेशनबाहेर बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून आरोपींचा सुगावा लागला जात आहे.