अलिबाग मध्ये मोफत मधुमेह, रक्तदाब तपासणी व जनजागृती शिबिर 

68

अलिबाग मध्ये मोफत मधुमेह, रक्तदाब तपासणी व जनजागृती शिबिर 

अलिबाग मध्ये मोफत मधुमेह, रक्तदाब तपासणी व जनजागृती शिबिर 
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:-उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था खंडाळे अलिबाग संचलित उज्ज्वल होम नर्सिंग सेवा दवाखाना पिंपळभाट येथे मधुमेह व रक्तदाब तपासणी व जनजागृती शिबिर आयोजित करण्यात आले.
दर महिन्याच्या 10 व 25 तारखेला हा शिबिर आयोजित करण्यात येतो. सकाळी आठ ते 11 या वेळेमध्ये उपाशीपोटी व खाल्ल्यानंतरचे रक्त तपासणी करण्यात येते.
यावेळी जनशिक्षण संस्थान अध्यक्ष डॉ. नितीन गांधी, माणुसकी प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ. राजाराम हुलवान, तेजस्विनी फाउंडेशन संस्थापिका जीविता पाटील, उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था संस्थापिका उज्ज्वला चव्हाण, डॉ. सत्यम, डॉ. आनन पाटील, डॉ. सागर गवळी, सेवा दवाखाना स्टाफ व लाभार्थी उपस्थित होते.
आजच्या धकाधकीच्या जीवनात मधुमेह व रक्तदाब बऱ्याच लोकांना होत आहे तर टेन्शन, स्वतःसाठी वेळ न मिळणे, व्यस्त दैनंदिन जीवन, अयोग्य आहार, अती जंक फूड सेवन या सर्वांमुळे मधुमेह व रक्तदाब होत असतो. याचे निर्मूलन व जनजागृती करण्यासाठी अशा कॅम्पची आवश्यकता असल्याचे डॉ. नितीन गांधी यांनी सांगितले. तेजस्विनी फाउंडेशन संस्थापिका एड. जीविता पाटील यांनी प्रत्येकाने स्वतःची काळजी घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था संस्थापिका उज्ज्वला चव्हाण यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करीत उपस्थित मान्यवरांचे व लाभार्थ्यांचे आभार मानले.