पश्चिम रेल्वेवरील ब्लॉक मुळे प्रवाशांचे मोठ्याप्रमाणात हाल.

36

पश्चिम रेल्वेवरील ब्लॉक मुळे प्रवाशांचे मोठ्याप्रमाणात हाल.

पश्चिम रेल्वेवरील ब्लॉक मुळे प्रवाशांचे मोठ्याप्रमाणात हाल.

✍️ पप्पू वि. नायर ✍️
मुंबई शहर प्रतिनिधी
📞 7304654862 📞

मुंबई :- पश्चिम रेल्वेवरील माहीम व बांद्रा स्थानकावरील पुलाच्या नूतरीकरण पुनःबंधणी शुक्रवारी रात्रीपासून 9:30 तासांचा ब्लॉक घेण्यात आला होता. या ब्लॉक चे परिणाम शनिवारी संपूर्ण दिवस गंभीर दिसून आला. लोकल 10,20,मिनिट उशिराने धावत होत्या. त्यामुळे पश्चिम रेल्वे च्या महत्वाच्या स्थानकावर प्रवाणशांची प्रचंड गर्दी होताना दिसून आले.तर काहींनी कामावर रिक्शा चा तर बस चा मार्ग अवलंबला. तर काहींनी लोकल च्या प्रचंड गर्दीत धकाबुक्कीत नाईलाजाने जावे लागले.

पश्चिम रेल्वे च्या उप आणि डाउन धिम्या मार्गांवर शनिवारी रात्री 11.वाजता ते रविवारी सकाळी 8:30 पासून खोलंबला होता ब्लॉक मधे अक्सरश प्रवाशांना नाहक त्रास सोसावा लागला.शनिवारी पूर्ण दिवस लोकल रेल्वे चे वेळापत्रक पूर्ण कोळंडलेले दिसून आले.

त्यानंतर लोकल सेवेचे वेळापत्रक टाइम्स मीटर वर दाखवून चालवण्यात आले, परंतु लोकल 15 ते 20 मिनिट उशिराने धावू लागल्या.महत्वाच्या म्हणजे बोरिवली, अंधेरी,दादर, चर्चगेट स्थानकावर प्रवाशांचे मोठे हाल पाहवयास मिळाले.तर काही प्रवाशी लोकल मधून खाली उतरून पायी मार्गस्थ झाल्याचे पाहायला मिळाले.