माध्यमिक विद्यालय धारशेरी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण उत्साहात संपन्न

91

माध्यमिक विद्यालय धारशेरी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण उत्साहात संपन्न

माध्यमिक विद्यालय धारशेरी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण उत्साहात संपन्न

सालाबादप्रमाणे ध्वजारोहणाचा मान शेरी गावाला देण्यात आला.

✍️ निलेश सोनवणे ✍️
जळगाव तालुका प्रतिनिधी
मो :- 9922783478

जळगाव :- सविस्तर वृत्त असे की, सालाबादप्रमाणे ध्वजारोहणाचा मान शेरी गावाला देण्यात आला. शेरी गावाचे विद्यमान सरपंच सौ.विमलबाई देविदास चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.तर ध्वज पूजन विद्यमान उप सरपंच श्री. भिकन भाईदास कोळी यांनी केले. माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.मयूर पाटील सर यांच्या मार्गदर्शनानुसार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.धारशेरी गावाचे आजी-माजी सरपंच,उपसरपंच,सदस्य, पोलिस पाटील , धारशेरी गावातील प्रतिष्ठित नागरिक.पालक वर्ग , ग्रामस्थ,बंधू आणि भगिनी, माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी कार्यक्रमाला उपस्थित होते.पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी भाषण व देश भक्तीपर नृत्य सादर केले.इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी देश भक्तीपर गीत सादर केले.तसेच धार गावातून पथ संचलन करून ग्राम पंचायत कार्यालयाचे देखील धार चे उप सरपंच श्री.सौरभ लखीचंद पाचपोळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.त्या ठिकाणी इयत्ता 9 वीच्या विद्यार्थिनींनी ध्वज गीत सादर केले.गावातील काही नागरिकांना सन्मान चिन्हें देवून गौरविण्यात आले. सदरील या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.जी. ए. बयस सर केले .तसेच कार्यक्रमाची प्रस्तावना श्री.सुधाकर पाटील सर यांनी केली . तसेच कार्यक्रमाचा समारोप करून श्रीमती.सविता आखरे मॅडम यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.