Coming to Hinganghat to Sonegaon (Ra) bus ferry is a relief to the passengers
Coming to Hinganghat to Sonegaon (Ra) bus ferry is a relief to the passengers

हिंगणघाट ते सोनेगाव(रा) बस फेरी सुरू झाल्याने प्रवाशांना दिलासा – डॉ.पर्बत यांच्या पाठ पुराव्याला यश.

 Coming to Hinganghat to Sonegaon (Ra) bus ferry is a relief to the passengers
प्रा. अक्षय पेटकर प्रतिनिधी

हिंगणघाट:-  तालुक्यातील आजणसरा गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या सोनेगाव राऊत येथील बस फेरी कोरोना लॉक डाऊन पासून बंद करण्यात आली होती. त्यामुळे गावकऱ्यांसह विद्यार्थी व आजणसरा येथे भोजाजी महाराजांचे दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत होता त्यामुळे या सर्कलचे पं. स.सदस्य डॉ विजय पर्वत यांनी पुढाकारातून आजणसरा चे सरपंच श्रावण काचोळे यांनी सोनेगाव येथील बस सेवा सुरू करण्या संदर्भात ठराव घेऊन 25 जानेवारी ला हिंगणघाट आगाराचे सहाय्यक वाहतूक अधीक्षक मसराम यांची डॉ विजय पर्वत यांच्या नेतृत्वात सरपंच श्रावण काचोळे उपसरपंच नरेंद्र पाटील, ग्रा. प.सदस्य विठ्ठल मडावी, माजी उपसरपंच प्रमोद बुरीले, सुपारे गुरुजी यांनी भेट घेऊन निवेदन देताच मसराम यांनी तात्काळ मान्य करून काल 27 जानेवारी पासून बस सेवा सुरू करण्यात आली आहे.

ही बसफेरी सकाळी 6 व 10 वाजता आणि सायंकाळी 4.45 या वेळात राहणार आहे ,काल 27 जानेवारी ला लालपरी गावात येताच नागरिकांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले यावेळी पं. स. सदस्य डॉ पर्वत यांनी एस. टी. बस चे पूजन करून चालक व वाहक यांचा सत्कार करून पुढील प्रवासासाठी हिरवी झेंडी दाखवली यावेळी माजी उपसरपंच प्रमोद बुरिले, नागोराव बरीले, कंगाले, संतोष लोणकर, अण्णाजी लोणारे, ग्राम. प.सदस्य विठ्ठल मडावी, मुडे सुपारे गुरुजी, रमेश पवार यांच्या सह गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here