नवरात्र उत्सव मंडळा कडून प्रजासत्ताक दिनानिमित्त अन्नदान

66

नवरात्र उत्सव मंडळा कडून प्रजासत्ताक दिनानिमित्त अन्नदान

नवरात्र उत्सव मंडळा कडून प्रजासत्ताक दिनानिमित्त अन्नदान

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:-नवरात्र उत्सव मंडळाकडून दरवर्षी वेगवेगळे विधायक उपक्रमांचे नियोजन केले जाते. कधी रक्तदान कधी श्रमदान कधी वक्तृत्व स्पर्धा कधी नृत्य स्पर्धा तर यावर्षी नाविन्यपूर्ण अशी अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करून प्रजासत्ताक दिन साजरा केला. अन्नदानासाठी पंढरीनाथ प्रधान गोंधळ पाडा, रुपेश गावंड पोईनाड, नवनाथ आणि नितीन कोळी रेवस, आणि पाटील ट्रेडर रांजणखर यांच्याकडून संपूर्ण व्यवस्था करण्यात आली. मंडळाचे कार्यकर्ते.. संतोष म्हात्रे, सूर्यकांत म्हात्रे, अरुण पाटील, दत्तात्रेय पाटील, अंबाजी पाटील, धनंजय पाटील, अमेय पाटील, सौ सुप्रिया पाटील, सौ योगिता पाटील यांनी अन्नदानासाठी सहकार्य केले. संपूर्ण भोजन व्यवस्था जेवण करण्याचे काम रांजणखर गावातील सुरेंद्र म्हात्रे, बंडू दादा, दिलीप पाटील, विजय म्हात्रे, आदिवासी वाडीवरील सर्व महिला आणि पुरुष सदस्य यांनी भाग घेऊन कार्यक्रम अतिशय आनंदात आणि उत्साहात पार पाडला. विशेष म्हणजे शंकर वाघमारे, आणि सुभाष यांनी मोलाचे सहकार्य केले.