Awareness of Addiction Change in Phukata village in Hinganghat taluka.
Awareness of Addiction Change in Phukata village in Hinganghat taluka.

हिंगणघाट तालूक्यातील फुकटा या गावात व्यसनाधींनते बदल जनजागृती.

 Awareness of Addiction Change in Phukata village in Hinganghat taluka.

वडनेर पोलीसानी ग्रामस्थांनी उपस्थीत व्यसनमुक्ती करिता बोलावली ग्रामसभा.

प्रा. अक्षय पेटकर प्रतिनिधी
वडनेर:- आजच्या तरुणामध्ये मोठ्या प्रमाणात व्यसनाधींनताचे प्रमाण वाढत आहे. हे बघता सर्व स्थरातुन याबदल जनजागृती होणे आवश्यक आहे. त्यामुळे हिंगणघाट तालूक्यातील वडनेर पोलिस स्टेशनचा हदीत येणा-या फुकटा या गावी वडनेर पोलिस स्टेशनचे निरीक्षक राजेंद्र शेटे यांनी येथील फुकटा येथील सरपंच यांना फ़ोन करुन गावात मोठ्या प्रमाणात वाढत असलेल्या दारु विक्री तसेच आजच्या तरुण पिढीत व्यसनाधींन जे प्रमाण वाढत आहे त्याबद्दल ग्रामस्थांच्या ग्रामसभेचे आयोजन करण्यास सागितले.

त्यानुसार 30 जानेवारी रोजी फुकटा या गावी ग्रामस्थाची ग्रामसभा बोलावण्यात आली. सदरची ग्रामसभा गावातील वाढलेल्या दारुविक्री व गावातिल तरुण पिढीत व्यसनाधिनता मोठ्या प्रमाणात वाढत येतांनाचे चित्र दिसत असल्यामूळे सदरची ग्रामसभा वडनेर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राजेंद्र शेटे यांनी येथील सरपंच सौ.उमाटे,पोलीस पाटील आणी ग्रामस्थ ह्यांच्या उपस्थीतीत गावातील दारूबंदी होणेबाबत सदर गावची ग्रामसभा बोलाविली. ह्या सभेत गावातील जवळजवळ 200 गावकरी उपस्थीत होते विशेष महिलांचा मोठा सहभाग होता.

वडनेर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राजेंद्र शेटे यांनी उपस्थीत गावकरी व तरुण युवापिढी यांना आवर्जुन अवगत केले की व्यसनामुळे युवापीढीला समोर खूप मोठे नुकसान सहन करावे लागेल म्हणून आजच्या युवापिढीने वेळेत सावरुन जावे. तसेच दारु मुळे स्त्रियावर अत्याचार होतात दिसत आहे. हे कुठे तरी थांबले पाहिजे. अस मत व्यक्त केल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here