मीडिया वार्ता च्या बातमीच्या दणक्याने, महापालिका प्रशासनाला जाग

55

मीडिया वार्ता च्या बातमीच्या दणक्याने, महापालिका प्रशासनाला जाग

मीडिया वार्ता च्या बातमीच्या दणक्याने, महापालिका प्रशासनाला जाग

फेरीवाल्यांवर केली धडक कारवाई.

✍️ पप्पू वि. नायर ✍️
मुंबई शहर प्रतिनिधी
📞 7304654862 📞

मुंबई :- गोरेगांव पश्चिम प्रेम नगर मधे काल जागेच्या वादावरून फेरीवाल्यांमध्ये हाणामारी झाली होती. मीडिया वार्ता वृत्तपत्रात ती बातमी जाहीर होताच अवघ्या 24 तासात महापालिकेने पोलीस प्रशासनाला सोबत घेऊन प्रेम नगर मधल्या फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारला, सर्व यंत्रणा सोबत घेऊन पालिकेचे सर्व अधिकारी रस्त्यावर पाहायला दिसलें.

संध्याकाळी 7 वाजता कारवाईला सुरु करण्यात आली, कारवाई ची वेळ अगदी योग्य होती, पण येणार हे माहित असल्याने फेरीवाल्यांनी आपापल्या सामनांची जुळवा जुळव आदीच केली होती. त्यामुळे तिथे आलेल्या अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांना जास्त जप्तीचे सामान मिळाले नाही. परंतु फेरीवाल्यांची मोठी दमछाक पाहायला मिळाली.

पालिकेच्या कारवाईनंतर 1तास प्रेम नगर पूर्ण मोकळा झालेला दिसण्यात आला. पालिकेने कारवाई करून निघून गेल्यावर, परत फेरीवाल्यांनी ठाण मांडण्यात सुरुवात केली. पालिकेच्या कारवाईला न जुमानता फेरीवाल्यांचे च प्रेम नगर मधे वर्चस्व आहे हे परत फेरीवाल्यांनी परत एकदा दाखवून दिले. व पालिकेच्या कारवाईला केराची टोपली दाखवल्यासारखा प्रकार काहीसा दिसण्यात आला.

महापालिकेच्या अशा नियोजन शून्य कारवाईला फेरीवाले भीक घालत नाहीत, हे परत सिद्ध झाले. आता महापालिकेने ठोस निर्णय घेऊन मोठी कारवाई करण्याचे अपेक्षित आहे. जर अतिक्रमन विभागाच्या गाड्या फेरीवाला क्षेत्रात उभी करून ठेवली तर काहीसा फरक दिसण्यात येईल. नाहीतर पालिका प्रशासन अशा कितीही कारवाया केल्या तरी फेरीवाले बंद होणार नाही, काहीतरी उपाययोजना महापालिकेला करायला हवी. दररोज जर अतिक्रमाणाच्या गाड्या योग्य वेळी आल्या तर काहीसा फरक पडेल, व त्या भीतीने फेरीवाले थोडया प्रमाणात कमी होताना दिसून येतील.

आता महापालिका फेरीवाल्यांचा विषय किती गांभीर्याने घेते हे पाहायला लागेल. जर पालिकेला हा विषय तात्पुरता वाटत असेल व हे असंच चालू राहिलं, मुक्त फेरीवाला प्रेम नगर चा विषय जर पालिकेला सुटत नसेल तर, स्थानिक पत्रकार व समाजसुधारक नात्याने सर्व विषय मुख्य महापालिकेचे आयुक्त श्री. गगराणी साहेब, व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र जी फडवणीस साहेबांकडे त्यांना आपण स्वत भेटून सर्व पुराव्या सहित संपूर्ण माहिती देणार, हे निश्चित आहे, मग त्यांच्याकडून काय कारवाईचे आदेश मिळतील, ते सर्वाना लवकरात कळेल.