पी.एन.पी महाविद्यालयात नवीन कायदा अंमलबजावणीवर जनजागृती.

64

पी.एन.पी महाविद्यालयात नवीन कायदा अंमलबजावणीवर जनजागृती.

पी.एन.पी महाविद्यालयात नवीन कायदा अंमलबजावणीवर जनजागृती.

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:-प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून दि.३१ जानेवारी रोजी ‘ नवीन कायदा अंमलबजावणी आणि जनजागृती’ यावर व्याख्यान आणि चर्चासत्र घेण्यात आले.

याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी विनीत चौधरी, भारत फर्णे (एपीआय), त्रिरत्न पाईकराव (विधी अधिकारी), हर्षल पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

नवीन कायदा अंमलबजावणी यावर त्रिरत्न पाईकराव यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. भारत फर्णे यांनीसुद्धा पोलीस खात्यातील विविध कार्यपद्धतीवर आणि कायद्यांवर चर्चा केली.

उपविभागीय पोलीस अधिकारी विनीत चौधरी यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आपल्या जीवनात असलेल्या विविध पैलूंवर आणि आजकाल वाढलेल्या गुन्हेगारींवर सविस्तर मार्गदर्शन केले.

आपल्या अध्यक्षीय वक्तव्यामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओमकार पोटे यांनी कोणतेही कायदे समाजासाठी आणि देशासाठी हितकारकच असतात यावर भाष्य केले.

या कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक व राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. मिलिंद घाडगे प्रा .कैलास सिंह राजपूत प्रा. पूजा पाटील तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.
सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रा. मिलिंद घाडगे यांनी केले.