श्रीबाग येथे पालकर परिवार तर्फे भव्य हळदी कुंकू संपन्न

163

श्रीबाग येथे पालकर परिवार तर्फे भव्य हळदी कुंकू संपन्न

श्रीबाग येथे पालकर परिवार तर्फे भव्य हळदी कुंकू संपन्न

सर्वपक्षीय महिला नेत्यांची उपस्थिती

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:-श्रीबाग नं २ येथे महिला आयोजित भव्य हळदीकुंकू समारंभ मोठया उत्साहात पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर म्हणून शिवसेना नेत्या जिल्हापरिषद माजीसदस्या सौ. मानसी दळवी यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी शेकाप महिला आघाडी प्रमुख सौ. चित्रलेखा पाटील, शिवसेना जिल्हा संघटिका सौ. दीपश्री पोटफोडे, माजी नगराध्यक्ष सौ. मानसी म्हात्रे, अलिबाग तालुका संघटिका सौ. स्नेहल देवळेकर, डॉ. सौ. मेघा घाटे मॅडम, माजी नगरसेविका सौ. संजना कीर, प्रिया घरत, युवती सेना तालुका संघटिका सौ. दर्शना वाकडे, विभागीय संघटिका सौ. पूनम नाईक, शिवसेना महिला नेत्या दिपश्री पाटील, सौ. कर्णिक मॅडम, सौ. अपर्णा पालकर आणि या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजिका ॲड. श्वेता संदीप पालकर यांच्या सर्व सहकारी श्रीबाग नं २मधील महिला यांच्या प्रयत्नाने पार पडला. या कार्यक्रमांचा आनंद श्रीबाग मधील महिलांनी मोठया प्रमाणात घेतला.
या वेळी उपस्थित महिलांसाठी विविध करमनुकीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. खेळ पैठणीचा हा महत्त्वाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या मध्ये अनेक महिलांनी भाग घेतला.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रीतम सुतार यांनी आपल्या शैलीत उत्तमरीत्या केले यावेळी विजेत्या महिलेला पालकर परिवारातर्फे पैठणी देऊन गौरविण्यात आले. तसेच इतर सर्व सहभागी स्पर्धकांना भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.