मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीची तरतुद करण्यात यावी, सम्यक विद्यार्थी आंदोलन पुणे तर्फे केंद्र सरकारला निवेदन.

51

मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीची तरतुद करण्यात यावी, सम्यक विद्यार्थी आंदोलन पुणे तर्फे केंद्र सरकारला निवेदन.

 पुणे:- सम्यक विद्यार्थी आंदोलन पुणे जिल्ह्याच्या व पिंपरीचिंचवड शहराच्या वतीने २०२०-२१ च्या केंद्रीय बजेट मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीची तरतुद करण्यात यावी व ती रद्द करण्यात येऊ नये या साठी आज केंद्र सरकारला निवेदन देण्यात आले.

मोदी सरकार १ फेब्रुवारीला संसदेत सकाळी ११ वाजता २०२१-२०२२ चे केन्द्रीय बजेट सादर करणार आहे. डॅा.बाबासाहेब आंबेडकरांनी मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती स्वातंत्र्यपूर्व काळात मागास विद्यार्थ्यांसाठी सुरू केली होती, ती बंद करण्याचे षडयंत्र इथल्या मनुवादी केंद्र सरकारने ठरविले आहे.सुमारे ६२ लाख मागासवर्गीय विद्यार्थी या शिष्यवृत्तीचे लाभार्थी आहेत. त्यांना शिष्यवृत्ती पासून वंचित ठेवण्याचे काम केंद्र सरकार करीत आहे.या मुळे मागासवर्गीय विद्यार्थ्याला पुढील शाहैक्षणीक वाटचाल करण्यामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष करावा लागणार आहे म्हणून ह्या कठोर निर्णयाच्या विरोधात पुणे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख साहेबांना निवेदन सादर करण्यात आले.

 Provision should be made for post-matric scholarship, statement from Samyak Vidyarthi Andolan Pune to the Central Government.
यावेळी सम्यक चे पदाधिकारी शुभम ज्ञानेश्वर चव्हाण अध्यक्ष पुणे शहर व जिल्हा, सम्यक विद्यार्थी आंदोलन संतोष जोगदंड, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष, ओमकार कांबळे युवा नेते, राहुल गायकवाड युवा नेते तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.