वसंत देशमुख मेमोरियल स्कूल ला माझी शाळा सुरक्षित शाळा सन्मान प्राप्त
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- रायगड पोलीस आयोजित रस्ता सुरक्षा अभियान २०२५ अंतर्गत सुरक्षित शाळा व स्टुडन्ट ऑफ रोड सेफ्टी सन्मान सोहळा बालगंधर्व रंग भवन रिलायन्स फाउंडेशन नागोठणे या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता.
या उपक्रमासाठी रायगड जिल्ह्यातून *५००* शाळांचे सर्वेक्षण करण्यात आले होते त्यापैकी *२८* शाळांनी *९०%* पेक्षा जास्त सरकारचे सुरक्षाविषयक मानांकन पूर्ण केले होते.
या शाळांमधूनच खोपोली पोलीस हद्दीतून *वसंत देशमुख मेमोरियल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स* या शाळेची माझी शाळा सुरक्षित शाळा या उपक्रमांमध्ये *सुरक्षित शाळा* म्हणून निवड करण्यात आली आहे.
याबद्दल संस्थेचे सर्व पदाधिकारी, शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, सर्व विद्यार्थी, आणि पालक वर्ग या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन.
सदर सन्मान सोहळा माननीय आमदार आदिती ताई तटकरे बालविकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच मा. संजय दराडे विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परीक्षेत्र.
मा. किशन जावळे जिल्हाधिकारी रायगड.
मा. भरत बास्टेवाड
मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड. हे सुद्धा उपस्थित होते.
यावर्षी शाळा २५ व्या वर्षात पदार्पण करत असताना सुरक्षित शाळा म्हणून मिळालेल्या सन्मानामुळे शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांची सुरक्षा तसेच लोक जनजागृतीसाठी शाळेतून केल्या जाणाऱ्या कार्यक्रमाचेही कौतुक करण्यात आले.
२५ व्या वर्षात पदार्पण करत असताना शाळेच्या शिरपेच्यात अजून एक मानाचा तुरा रोवला गेल्यामुळे सर्व स्तरातून शाळेचे कौतुक केले जात आहे.