मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त
दीक्षाभूमीवर भगवान बुद्धांच्या अस्थींचे आज आगमन.
त्रिशा राऊत नागपुर जिला ग्रामीण प्रतिनिधी
मो 9096817953
नागपूर : मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवार (दि. ७) अमरावती येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी दिल्लीवरून भगवान गौतम बुद्धांच्या अस्थी आणण्यात येत आहेत.
या अस्थी ६ फेब्रुवारीला पवित्र दीक्षाभूमीवर दुपारी ३ ते सायंकाळीदरम्यान दर्शनासाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती महाबोधी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष भदन्त हर्षबोधी यांनी पत्रकार परिषदेत केले. ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीकडून
अस्थिदर्शनासाठी ठेवण्याची परवानगी मिळाली आहे. दर्शनासाठी येताना बौद्ध बांधवांनी पांढरे शुभ्रवस्त्र परिधान करून येण्याचे आवाहन त्यांनी केले. पत्रकार परिषदेला भय्यासाहेब खैरकर, संजय मून, भदन्त चंद्रबोधी, भदन्त एस. राहुल, नरेश गायकवाड, अनिल कोंडमारे उपस्थित होते.