जळगावात हेल्मेट सक्तीचे, नियमांचे उल्लंघन केल्यास एक हजारापर्यंत होऊ शकतो दंड

37

जळगावात हेल्मेट सक्तीचे, नियमांचे उल्लंघन केल्यास एक हजारापर्यंत होऊ शकतो दंड

✍️निलेश सोनवणे✍️
जळगांव तालुका प्रतिनिधी
मो. :- ९९२२७८३४७८

जळगांव :- याबाबत सविस्तर वृत्त असे की, जळगावमध्ये दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढले आहे. राष्ट्रीय महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले असल्याने मानवी मृत्यू चे प्रमाण वाढले आहे.त्यामुळे शासनाने अपघात टाळण्यासाठी फेब्रुवारी महिन्यापासून दुचाकी चालवत असताना हेल्मेट परिधान करणे सक्तीचे केले आहे.. यापुढे दुचाकी चालकाला व मागे बसणाऱ्याला सुद्धा हेल्मेट डोक्यात घालणे सक्तीचे झाले आहे.तसेच ४ वर्षांवरील व्यक्तीला सुध्दा हेल्मेट घालावे लागणार आहे. हेल्मेटचा वापर न करणाऱ्या व्यक्तीला एक हजारापर्यंत दंड आकारण्यात येणार आहे.
वाहतूक नियत्रंण विभागाने महामार्गावर ठिकठिकाणी पोलिस यंत्रणा तैनात केली आहे.यांच्या मार्फत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींकडून दंड आकारण्यात येणार आहे. हेल्मेट घालणे हे प्रत्येक व्यक्तीला आपल्या सुरक्षेसाठी खूपच उपयोगी आहे. या अगोदर शासनाने १ जानेवारी २०२५ पासून राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी चालवत असताना हेल्मेट घालण्याचा निर्णय घेतला होता.परंतु आताचा निर्णय हा दुचाकीच्या मागे बसणाऱ्या व्यक्तीला सुद्धा हेल्मेट घालणे अनिवार्य केले आहे. याच्या मुळे वाढत्या अपघातांचे प्रमाण कमी होईल अशी आशा वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक श्री.राहुल गायकवाड यांनी व्यक्त केली आहे.