पेढांबे ग्रामपंचायत मध्ये आरोग्य शिबीर संपन्न

107

पेढांबे ग्रामपंचायत मध्ये आरोग्य शिबीर संपन्न

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेढांबे येथे ग्रामपंचायत पेढांबे व संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.या शिबिराचा पंचायत हद्दीतील अनेक लोकांनी लाभ घेतला .
ग्रुप ग्रामपंचायत पेढांबे च्या वतीने शुक्रवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये संजीवनी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल यांच्या वतीने ब्लड प्रेशर,रक्तातील साखरेचे प्रमाण व डोळ्यांची तपासणी करण्यात आली. तसेच इतर आजारांवरही तपासणी करण्यात आली.या मधून गरजू रुग्णांना मोफत औषध पुरवठा करण्यात आला होता. या शिबिरामध्ये ग्रामपंचायत हद्दीतील सातघर, शेखाचे गाव, कणकगिरी, केतकीचा मळा, विहिरीचा पाढा, पेढाबे, सरदार वाडा, सांडेपाडा, या गावातील लोकांनी लाभ घेतला. या शिबिरामध्ये डॉ. रूपाली पाटील,डॉ. कल्याणी मोरे परिचारिका मयुरी मुंबईकर, नितेश म्हात्रे, चैताली पाटील,नेत्र चिकित्सक महादेव काटक, प्रमोद पाटील, प्रसिद्धीप्रमुख सिद्धार्थ शिंदे, विनेश पाटील, राहुल म्हात्रे यांनी एक वर्षापासून ते 90 वर्षापर्यंत चे रुग्ण तपासण्यात आले. ज्या रुग्णांना मोतीबिंदूचा ऑपरेशन करणे गरजेचे आहे .त्यांचा मोफत ऑपरेशन जेएसडब्ल्यू चे संजीविनी हॉस्पिटलमध्ये करण्यात येणार आहे. हे शिबीर यशस्वी होण्यासाठी पेढाबे ग्रामपंचायत सरपंच सौ रसिका पाटील, ग्रामपंचायत सदस्य अनिल पाटील , ॲड.रत्नाकर पाटील, प्रतीक म्हात्रे, श्रुती बैकर, साक्षी पाटील, अंगणवाडी कर्मचारी, आशा सेविका यांनी विशेष परिश्रम घेतले.