माध्यमिक विद्यालय खर्ची येथे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न

31

माध्यमिक विद्यालय खर्ची येथे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न

✍️ *निलेश सोनवणे*✍️
*जळगांव तालुका प्रतिनिधी*
मो. :-९९२२७८३४७८

*जळगांव* :- सविस्तर वृत्त असे की, एरंडोल तालुक्यातील खर्ची येथील माध्यमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेह संमेलन अतुल्य भारत या थीमवर आधारित सांस्कृतिक महोत्सव दिमाखात पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन मा.श्री. नानाभाऊ पोपट महाजन मा.जि.प.सदस्य होते. संमेलनाचे उद्घाटन एरंडोल पं.समितीचे गट शिक्षणाधिकारी श्री.आर. डी.महाजन साहेब यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री.मोहन भाऊ सोनवणे मा.सभापती पं.स.एरंडोल , जयश्रीताई महाजन मा.जि.प.सदस्य, श्री.जे के पाटील सर शा.पो.आ. अधिक्षक, मनीषा सोनवणे केंद्रप्रमुख, आशाबाई विठ्ठल महाजन सरपंच खर्ची बु., रुखमाबाई मराठे सरपंच खर्ची खु. व विविध संस्थेचे पदाधिकारी यांचे बुके शाल व श्रीफळ देऊन सत्कार विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक श्री.ए. व्ही. माळी सर व शिक्षकांनी केला.
अतुल्य भारत या थीम वर आधारित विविधतेत एकता दर्शविणारे नृत्य जसे; घूमर, कथ्थक, लावणी, काश्मिरी, गरबा, भांगडा,आदिवासी मराठी गीतांची धमाल नृत्य विद्यार्थ्यांनी केले. बाप-लेक, मोबाईलच्या दुरुपयोग- सामाजिक प्रबोधन पर नाटिका व गीत सादर केले. संमेलनाला पालकांच्या उत्साह मोठ्या प्रमाणात होता व उपस्थित श्रोत्यांनी देखील मनमुराद आनंद लुटला.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आर.डी.महाजन साहेब यांनी पालकांना ग्रामीण भागात दिले जाणारे शिक्षणाचे महत्त्व समजून सांगितले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष नानाभाऊ महाजन यांनी आदर्श शिक्षक कसा असावा यावर भाष्य केले. प्रास्ताविक करताना मुख्याध्यापक श्री.ए.व्ही. माळी यांनी मागील दशकापासून विद्यालयाच्या वाटचालीचा उल्लेख केला. भूमिपुत्र सेवा फाउंडेशन व कै. देवकाबाई शिकोकर सार्वजनिक वाचनालय खर्ची यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे सर्व शिक्षकवृंद एस.एम.महाजन ,आर.एस. महाजन, कविता मॅडम, सोनाली पाटील मॅडम, प्रीती जाधव मॅडम, ग्रामस्थ दगडू महाजन, भुरा महाजन, प्रवीण महाजन, डॉ. देवरे,अजितसिंग पाटील आदी यांनी मदत केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे उप शिक्षिका चव्हाण मॅडम व लोखंडे मॅडम तर आभार प्रदर्शन पी. पी. माळी सर यांनी केले