निःशुल्क फिरते रूग्णालय गोरगरिबांसाठी वरदान ♦️हंसराज अहिर यांचे प्रतिपादन

39

निःशुल्क फिरते रूग्णालय गोरगरिबांसाठी वरदान
♦️हंसराज अहिर यांचे प्रतिपादन

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 7 फेब्रुवारी
निःशुल्क फिरते रूग्णालयांच्या सेवेमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीचे मोठे योगदान आहे. चंदनखेडा व परिसरात गॅस अथॉरिटी ऑफ इंडियाद्वारा निःशुल्क फिरते रूग्णालय हे याच धोरणाचे प्रतिक असून, हे फिरते रूग्णालय भद्रावती तालुक्यातील गोरगरीब जनतेला वरदान ठरेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केले.
भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथे गुरुवारी गॅस अथॉरिटी ऑफ इंडियाद्वारा सामाजिक दायित्व निधी अंतर्गत नि:शुल्क फिरते रूग्णालयाच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास आ. करण देवतळे, गेलचे कार्यकारी निदेशक अनुप गुप्ता, संचालक रविकांत कोल्हे, महाजन, डॉ. भगवान गायकवाड, अशोक हजारे, प्रशांत डाखरे, माजी जि. प. सदस्य मारोती गायकवाड, विजय वानखेडे, डॉ. सागर वझे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अहिर यांनी, या फिरत्या रूग्णालयाचा लाभ ग्रामीण भागातील सर्व स्तरातील रूग्णांनी घ्यावा, असे आवाहन केले. चंदनखेडा येथे लोकार्पण झालेल्या या रूग्णालयामुळे रूग्णांना मोठी सोय होणार असून, रूग्णांच्या तक्रारीचे निरसन होईल. त्यामुळे हे रूग्णालय नागरिकांच्या जिवीतासाठी मोलाचे ठरले, असेही अहिर म्हणाले.