अकुशल मजुरांची थकित मजुरी खात्यात जमा

47

अकुशल मजुरांची थकित मजुरी खात्यात जमा

♦️आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना यश

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 7 फेब्रुवारी
पोंभुर्णा तालुक्यातील महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामावरील अकुशल मजुरांच्या थकित मजुरीची रक्कम मजुरांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. माजी मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात केलेल्या प्रयत्नांना यश प्राप्त झाले आहे.
पोंभुर्णा तालुक्यातील विविध गावामधील मजूर महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत सुरू असलेल्या कामावर अकुशल मजूर म्हणून काम करीत आहे. शासनाकडून निधी प्राप्त न झाल्यामुळे त्यांना गेल्या दोन महिन्यांपासून मजुरी मिळालेली नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. मजुरांनी या समस्येसंदर्भात आ. सुधीर मुनगंटीवार यांच्याशी भेट घेतली व आपली कैफियत मांडली. मुनगंटीवार यांनी रोहयो मंत्री भरत गोगावले यांच्याशी संपर्क साधत देय असलेला निधी शासनाकडून त्वरित उपलब्ध करून देण्याची विनंती केली व पाठपुरावा केला. मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांच्या फलस्वरूप मजुरांच्या खात्यात त्यांच्या मजुरीचे पैसे जमा झाले आहे.