४६ व्या राष्ट्रीय थ्रोबॉल स्पर्धेत चंद्रपूरच्या खेळाडूंचा महाराष्ट्र संघात सहभाग
साहिल सैय्यद 🖋️/प्रतिनिधि
📲9307948197
चंद्रपूर : जिल्ह्यातील खेळाळू आता राज्य व देशाच्या पातळीवर चमकत असून आपल्या कलागुणांनी जिल्ह्याचे नाव देशात चमकवीत आहे.
46 व्या राष्ट्रीय थ्रोबॉल स्पर्धे करीता महाराष्ट्रातील संघांचे गठण केल्या जात असून महाराष्ट्र थ्रोबॉल संघटना व चंद्रपूर जिल्हा थ्रोबोल संघटनाच्या वतीने चंद्रपूर येथील रहवासी कनिष्का सुनील गाडगे माउंट कार्मेल स्कूल चंद्रपूर हिची महाराष्ट्र संघात निवड झाली तसेच कोमल वाकळे यांची महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक म्हणून निवड झाली ते थ्रोबॉल असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित ४६ व्या राष्ट्रीय थ्रोबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघात खेळणार आहे.
ही स्पर्धा मध्य प्रदेश थ्रोबॉल असोसिएशन व थ्रोबॉल फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानाने ओल्ड चॅम्पियन प्लेग्राउंड एरिया कॉलनी भोपाळ मध्य प्रदेश येथे ४ ते ७ फेब्रुवारीला होणार आहे. या खेळाडूला भास्कर फरकाडे कोमल वाकडे व अरविंद बुरडकर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच शाळेच्या मुख्याधिका सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तसेच पालकांनी खेळाडूचे अभिनंदन केले.