बेंगळुरूतील मल्लेश्वरमधील एका महाविद्यालयात एन्टरटेनमेंट चॅनलवरील आगामी रिअॅलिटी शोसाठी ऑडिशन सुरू होते. या ऑडिशनला अनेक तरुणींनी हजेरी लावली होती. परंतु, तिथे त्यांना वेगळाच अनुभव आला. ऑडिशनच्या वेळी त्यांना खासगी आयुष्यातील अनेक प्रश्न विचारण्यात आले. तुझे किती लवर्स आहेत? तुला सेक्सबद्दल माहीत आहे का? तू कधी सेक्स केलयंस का?… उत्तरं द्यायला संकोच वाटेल अशा अनेक अश्लिल प्रश्नांची सरबत्तीच त्यांच्यावर करण्यात आली. ऑडिशनमधील हा प्रकार इतक्यावरच थांबला नाही. तर ऑडिशनच्या पुढच्या राउंडमध्ये जायचे असल्यास अंगावरील सगळे कपडे काढून नग्नावस्थेत समोर असलेल्या पुरुषाला किस करण्यासही सांगण्यात आल्याची धक्कादायक माहिती एका तरुणीनं दिली.
ऑडिशनमध्ये घडणाऱ्या या प्रकाराची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक तरुणींचे पालक त्या ठिकाणी पोहोचले. संतप्त पालकांची संख्या पाहून शेवटी पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी ऑडिशन बंद करायला लावले.