संतापजनक वार्ता :- नंदगावात घाणीचे साम्राज्य, गावकऱ्यांच्या आरोग्याकडे, व मूलभूत समस्यांकडे सरपंचाचे लयभारी दुर्लक्ष

79

संतापजनक वार्ता :- नंदगावात घाणीचे साम्राज्य, गावकऱ्यांच्या आरोग्याकडे, व मूलभूत समस्यांकडे सरपंचाचे लयभारी दुर्लक्ष

✍️ मीडिया वार्ता न्यूज ✍️

जळगांव :- सविस्तर वृत्त असे की, शासनाकडून “स्वच्छ भारत, स्वच्छ शहर,चा नारा देत आपले शहर व गाव स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले जात आहे.गाव व शहर स्वच्छ ठेवण्यासाठी खूप मोठा भर व खर्च करण्यात येत आहे.मात्र जळगांव तालुक्यातील नंदगावाची वाटचाल ही तेवढ्याच झपाट्याने अस्वच्छतेकडे होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न प्रथम स्थानी दिसून आला आहे.

सविस्तर वार्ता अशी की, नंदगावात सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले आहे.बऱ्याच ठिकाणी गटारी या तुंबून जात असताना गटारीचे दुर्गंधीयुक्त दूषित पाणी हे भर गल्लीत व रस्त्यावर ओसंडुन वाहते आहे.याकडे ग्राम पंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने वस्तीत राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य हे धोक्यात आहे. नंदगावात स्वच्छता अभियानाचे तीन तेरा वाजले आहे.गावात अनेक ठिकाणी गटारी या बंद आहेत तर सांडपाण्याची व्यवस्था न केल्याने दुर्गंधीयुक्त सांडपाणी रस्त्यावरच सोडले जात आहे.अनेक गल्लीत अगोदरच दैनंदिन साफ सफाई नसल्याने नेहमीच दुर्गंधी पसरली असताना या गटारीच्या घाण पाण्याची भर पडली आहे. त्यामुळे इतरांना शहाणपण शिकवणाऱ्या ग्राम पंचायतीच्या दिव्या खाली अंधार असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.गावातली गल्लीत भर रस्त्यावर गटारीचे घाण पाणी वाहत असून सर्वत्र दुर्गंधीयुक्त वातावरण झालेले आहे. नंदगावातील दलीत वस्तीतील लोकांना घरी ये-जा करण्यासाठी एकच मुख्य रस्ता आहे. अशा परिस्थितीत वस्तीतील रस्त्यावरच दूषित मलमूत्र गल्लीत वाहत असल्याने दुर्गंधीमुळे लहान मूल, शारिरिक कमजोर असलेले वयोवृध्द,लकवा झालेले रुग्ण,आजारी असलेले रुग्ण,पाय घसरून पडल्याने जीवित हानी होण्याचे संकेत आहेत. नागरिकांचे आरोग्याचं तर तीन तेरा या ग्राम पंचायत प्रशासनामुळे वाजले आहेत.नागरिक त्रासून गेलेले आहेत.लोक प्रतिनिधी विभागात तर अजिबात लक्ष देत नसल्याने नागरिकांच्या याप्रती संताप व्यक्त होत आहे.

आपल्या प्रभागातून महिल्यांच्या तसेच नागरीकांच्या समस्या काय आहेत हे माहिती करून घेण्याची कोणतीही तसदी घेत नाही आहे.लोक प्रतिनिधींकडून विकासाची अपेक्षा नसल्यामुळे नागरिकांनी आपल्या समस्या कोणाकडे मांडावी हा प्रश्न नंदगाव वासीयांना पडलेला आहे. गावातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ता प्रदीप दिलीप सोनवणे यांनी कित्येक वर्षांपासून तोंडी व लेखी समस्या अर्ज ग्राम पंचायत कार्यालयात दिलेले आहेत.त्यांच्या प्रत्येक अर्जावर गावाचे विद्यमान सरपंच दुर्लक्ष करीत आहे व अजून कोणतेही प्रकारचा न्याय देण्यात ते असमर्थ दिसून येत आहे.

लोक प्रतिनिधी विभागात तर अजिबात लक्ष देत नसल्याने नागरिकांच्या याप्रती संताप व्यक्त होत आहे.

नंदगावातील सरपंचाचे स्वच्छते बाबत लयभारी दुर्लक्ष करत आहेत अशी एकच चर्चा जन सामन्यात ऐकण्यात येत आहे. दलीत वस्तीचे समाज मंदिर (ओटा) जवळ तर काही समाज कंटक जाणून बुजून डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर (ओटा) दलीत वस्तीत असून त्या ठिकाणी समाज ओट्याची विटंबना होताना दिसून आली आहे.दलितांच्या समाज मंदिराजवळ गुरे-ढोरे व बैल गाडी बांधली जात असून त्यांचे दूषित मलमुत्र व त्या गुरे-ढोरांची विष्ठा त्या समाज मंदिराजवळ लागून पडलेली असते.त्यामुळे दलीत समाजाचे मन दुखावली जात आहेत. तरीही त्यांना आज पर्यंत सरपंच या अती संवेदनशील गोष्टीकडे दुर्लक्ष करीत आहे. वस्तीत दुर्गंधीयुक्त वातावरण असल्याने आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे.हे मानवी आरोग्यास खूपच हानिकारक असल्याने सरपंचांनी याकडे दुर्लक्ष करू नये अशी भावना नागरिकांकडून केली जात आहे.शासकीय जागेवर गुरे- ढोरे दलीत वस्तीत बांधली जात असून ती जागा मोकळी करण्यात यावी अशी मागणी ही बहुजन अधिकार संघटनेतर्फे देखील करण्यात आली आहे,त्यांची मागणी पूर्ण न झाल्यास ते कायदेशीर आमरण उपोषणाला लवकरच बसणार आहेत.धनगर वाड्यात तर भर रस्त्यात माती टाकलेली दिसून येत आहे .लकवा असलेले रुग्ण व अपंग व्यक्तींना खूपच तडजोड करून जावं लागत आहे.अती महत्वाचे असे की ग्राम पंचायतमध्ये आज पर्यंत जेवढे ही समस्या अर्ज देण्यात आले त्यांना आवक क्रमांक विनंती करूनही देण्यात आले नाही. रजिस्टर व तक्रार कंप्लेंट रजिस्टर नाही आहे. गटारींच्या घाण पाण्यामुळे व गुरे – ढोरे यांचे दूषित मलमूत्र खड्ड्यात साचवले जात असल्याने त्या ठिकाणी डासांचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.अशा वातावरणामुळे साथीचे रोग पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तेव्हा या समस्या ग्राम पंचायतने तत्काळ सोडवाव्यात अशी ग्रामस्थांची मागणी आहे.गावात मूलभूत सुविधांचा मोठा अभाव आहे.या सुविधा पुरवण्यासाठी ग्राम पंचायत अपयशी ठरत आहे.गावात बहुतांशी गटार या बंद व बुजलेल्या आहेत. गल्लीमध्ये पाण्याचे हौद बांधल्यामुळे त्यांच्यात साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होत आहे.सोबतच दुर्गंधीमुळे नागरिक बेजार झाले आहे.या संदर्भातून वस्तीत राहणाऱ्यांनी वेळोवेळी तोंडी व लेखी तक्रार भरपूर वेळेस दिले आहेत.तक्रारी देवून ही काही उपयोग झाला नाही, मुख्य मंत्री जरी आला तरी गुरे ढोरे व दूषित मल मूत्र येथून निघणार नाहीत अशी गलिच्छ भाषेत तक्रारीदारांना उत्तरे मिळत असतात.यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई लवकरात लवकर करावी.

घरातील कचरा टाकावा कुठे? नंदगावात गल्लीतला कचरा टाकावा कुठे असा प्रश्न दलीत वस्तीत निर्माण झाला आहे. कचरा कुंडीची वारंवार मागणी करून देखील कचरा कुंडी देण्यात आली नाही. कित्येक वर्षापासून कचरा व दूषित घाण हे शेजारीच घराजवळ टाकली जात आहेत.कचरा कुंडी फिरती सायकल हीचा वापर करताना एकही दिवस दिसली नाही.पूर्ण जंग व धुळीस खात स्वच्छ्ता अभियानाच्या वस्तू भंगारात ठेवण्यात आले आहे.कचरा कुंड्या व फिरती सायकल भंगारात पडलेल्या दिसून येत आहे.ग्राम पंचायत अशी जर झोपेच्या अवस्थेत राहिली तर गावाचा विकास कसा होईल व नागरिकांना दिलेल्या तक्रारीवर सरपंचाकडून न्याय मिळत नसल्याने गावात द्वेष निर्माण होताना दिसून येत आहे.

गल्ली एक; समस्या अनेक :- दलीत वस्तीत शासकीय जागेवर गुरे ढोरे बांधली जात असल्याने त्याचे उकिरडे व मलमूत्र हे खड्ड्यात साचवल्याने रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे. गुरे-ढोरे त्यांचा अंगावरील गोचीड व शेणातील कीटके हे घरात येत असून लहान मुलांपासून ते वयोवृद्ध पर्यंत हा त्रास सहन करावा लागत आहे.भर रस्त्यात मोठं-मोठे पाण्याचे हौद ठेवल्याने त्या हौदमध्ये कुत्रे अंघोळ करीत असल्याने लहान मूल त्याच हौदाच्या पाण्याने हात पाय धुतात. त्यामुळे त्वचेचे रोग त्यांना होताना दिसून येत आहे. सदर गंभीर समस्यांबाबत विद्यमान सरपंच स्वाती पवार व ग्राम सेवक यांच्याकडे वारंवार तक्रारी समस्या अर्ज करूनही ग्राम पंचायत प्रशासनाकडे मात्र या समस्यांकडे लक्ष देण्यासाठी वेळ नसल्याचे चित्र दिसून येत आहे.यामुळे ग्राम पंचायतीसह नंदगावचे आरोग्यही राम भरोसे असल्याचे चित्र दिसून येत आहे.सदरील समस्यांकडे नंदगाव ग्राम पंचायतीने त्वरित लक्ष देऊन नागरिकांच्या आरोग्याशी खेळ थांबवावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्री प्रदीप सोनवणे यांनी केली आहे.

पथदिवे बंद :- गावातील दलीत वस्तीच्या मैन चौकात ज्या ठिकाणी दुर्गंधीयुक्त पाणी साचलेले असते त्याच ठिकाणचे पथदिवे बंद असल्याने जवळच शेती व दाट गवताळ जागा असल्याने विंचू , साप निघून जीवित हानी झाल्यास या गोष्टीला ग्राम पंचायत जबाबदार राहील का? असा प्रश्न नागरिक विचारात आहे. काळोख्याचे साम्राज्य :- काही ठिकाणी पथदिवे बंद दिसून आले आहेत.पथदिवे बंद असल्याने चोऱ्या होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गावातील सुशिक्षित कुटुंबाने स्वच्छतेविषयी तक्रार केली म्हणून मारहाण :-
गावातील एका सुशिक्षित कुटुंबाने व सामाजिक कार्यकर्ता श्री.प्रदीप सोनवणे यांनी समस्यांचे तोंडी व तक्रारी अर्ज दिले म्हणून त्यांना व शेजारील कुटुंबालातील पुरुषांना व स्त्रियांना देखील बेशुद्ध होईपर्यंत मारहाण करण्यात आली. जातीवाचक शिवीगाळ करून यापुढे अर्ज केले तर तुम्हाला गावातून हाकलून लावू. नाही तर तुमच्या कुटुंबाला जिवंत राहू देणार नाहीत अशाही धमक्या देण्यात आल्या आहेत. तसेच सदरील कुटुंबावर काही खोटे आरोप देखील लावण्यात आले आहेत.सदरील कुटुंबाने तसे पोलिस प्रशासनला निवेदन दिले आहेत..त्याचे व्हिडिओ फुटेज तसेच ग्रामस्थांनी ग्राम पंचायत ला दिलेले अर्जाची प्रत देखील मीडिया वार्ता न्यूजच्या हाती लागले आहेत.या मारहाणीच्या हल्ल्यात श्री प्रदीप सोनवणे यांनी अट्रासिटी अंतर्गत गुन्हा जळगांव तालुका पोलिस स्टेशन ला दाखल करण्यात आला आहे.

भोंगळ कारभार व न्यायात कसूर :-
गेल्या मागील 5 ते 6 वर्षापासून तोंडी व लेखी समस्या अर्ज देवून न्याय दलीत वस्तीतील नागरिकांना मिळाला नाही आहे.न्याय मिळण्यासाठी पीडित कुटुंब आजही विनंती अर्ज देत आहेत. ग्राम पंचायतीचा मनमानी भोंगळ कारभार हा अशाच सुरू राहिला तर नागरिकांच्या समस्या कोण सोडविणार असा सवाल लोकांच्या मनात पडलेला आहे.लवकरात लवकर जिल्हा प्रशासनाने या ग्राम पंचायतीकडे लक्ष द्यावे ही विनंती समस्या असलेले नागरिक करत आहेत.