सिर्सी येथे.नवीन कायद्या विषयी मार्गदर्शन.
त्रिशा राऊत नागपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी.मो
9096817956
उमरेड.(सिर्सि)भारत सरकारने एक जुलै २०२४ पासून नवीन कायद्याची अंमलबजावणी सुरू केली असून प्रत्येकाने नवीन कायदे काय आहेत? कुणासाठी आहे? आणि कशी आहेत याबद्दलची माहिती असणे आवश्यक आहे. तेव्हा कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल ! असे उद्गार विधीतज्ञ प्रा. आश्लेषा चाऊजी यांनी सिर्सी पोलीस स्टेशनच्या वतीने कायद्याची कार्यशाळा अंतर्गत काढले. अध्यक्षस्थानी पीएसआय खंडेराव बोळगीर तर प्रमुख मध्ये डॉ. प्रा. समीर द्विवेदी ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ नागपुरे ग्रामपचायत सिर्सी सरपंच वंदना बुटे मनोज दंदाडे उपसरपंच अतुल नारनवरे आदि मान्यवर उपस्थित होते.
भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय साक्ष अधीनियम व महाराष्ट्र पोलीस कायदा ही कायद्याचे सुद्धा किती महत्त्व आहे आदी विषयावर प्रा. आश्लेषा चाऊजी यांनी माहिती दिली. सोबतच आजच्या जगामध्ये आर्टिफिशियल इंट्रीजेंट काय महत्त्व आहे याचीसुद्धा विस्तृत माहिती दिली. डॉ. समीर द्विवेदी यांनी सायबर गुन्हे म्हणजे मकडीचे जाळ यात माणूस अटकला की बाहेर निघताना त्रास होतो तेव्हा जाणकार बना सतर्क रहा असे मौलिक उदार यांनी काढले. स्मार्टफोन किती घातक असतो याबद्दल विस्तृत माहिती विद्यार्थ्यांनी शक्यतो वापरण्याचा प्रयत्न करू नये असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष खंडेराव बोळगीर यांनी व्यक्त केले. संचालन दिनेश गोळघाटे तर आभार पीएसआय बोळगीर यांनी मानले यांनी मानले कार्यक्रमाचे यशस्वी साठी हेडकॉन्स्टेबल अमोल कोठेवार अमोल काळे, प्रशांत खुफिया सोनू चटप, प्रवीण नैनवार यांनी परिश्रम घेतले.