‘शिक्षणोत्सव २०२४-२५’ रेशिमबाग नागपूर येथे सपन्न

62

‘शिक्षणोत्सव २०२४-२५’ रेशिमबाग नागपूर येथे सपन्न

✍🏻मंजुषा सहारे ✍🏻
नागपूर शहर प्रतिनिधी
मो 9373959098

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित ‘शिक्षणोत्सव २०२४-२५’ रेशिमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात सोमवारी (ता. १० फेब्रुवारी) समारोप झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माननीय शिक्षक आमदार श्री सुधाकर अडबाले, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनपा आयुक्त आणि प्रशासक डॉ. अभिजित चौधरी होते. मंचावर अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल, शिक्षणाधिकारी श्रीमती साधना सयाम, सहायक आयुक्त श्री नरेंद्र बावनकर, क्रीडा अधिकारी श्री पियूष आंबुलकर, क्रीडा नियंत्रण अधिकारी नियंत्रण अधिकारी श्री. नितीन भोळे, शिक्षक संघाचे सचिव श्री देवराव मांडवकर, सहायक शिक्षणाधिकारी श्री. सुभाष उपासे, श्री. संजय दिघोरे, मुख्य समन्वयक विनय बगले, अनिता भोतमांगे, प्रशांत टेंभुर्णे व इतर उपस्थित होते. याप्रसंगी शिक्षणोत्सवामध्ये आयोजित विविध सांस्कृतिक क्रीडा आणि इतर स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना पुरस्कार देन्यात आले.