सर्वोदय कन्या विद्यालय, सिंदेवाही येथे पाककृती स्पर्धा

35

सर्वोदय कन्या विद्यालय, सिंदेवाही येथे पाककृती स्पर्धा

पंचायत समिति शिक्षण विभाग सिंदेवाही तर्फे पाककृती स्पर्धा उत्साहात
जितेंद्र नागदेवते
सिंदेवाही प्रतिनिधी
8806689909 

सिंदेवाही :- “प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने”अंतर्गत शिक्षण विभाग पंचायत समिती सिंदेवाही येथील गटशिक्षणाधिकारी मा.किशोर पिसे सर यांचे मार्गदर्शनातून स्थळ:-सर्वोदय कन्या विद्यालय सिंदेवाही येथे”पाककृती स्पर्धा “आयोजित करण्यात आली.तृणधान्य जागरूकता विद्यार्थ्यांत निर्माण व्हावी यासाठी विविध तृणधान्य पदार्थांची आकर्षक मांडणी करण्यात आली.स्थानिक सिंदेवाही तसेच केंद्रस्तरावरून निवड झालेल्या महिला माता-पालक तथा शालेय स्वयंपाकिणींनी स्पर्धेत सहभाग घेतला.जि.प.व खाजगी अनुदानित व्यवस्थापनाच्या शाळातील सहभागास समान महत्त्व देण्यात आले. प्रथमतः “स्पर्धेचे उद्घाटक:-मा.छोटूभाई आवळे वि.अ.शिक्षण यांच्या हस्ते रिबन फीत कापून उद्घाटन करण्यात आले.पाककृती स्पर्धेच्या अध्यक्षा:-मा.संगीता यादव,प्राचार्या तर प्रमुख अतिथी म्हणून मा चिंतलवार मॅडम नगरसेविका ,डॉ.मोनिका कुळसंगे,डॉ.सुनिता लाकडे,अंगणवाडी पर्यवेक्षिका मा.बबीता गोंडाणे,मा. रुकसाना शेख यांची उपस्थिती लाभली.विस्तार अधिकारी यांनी प्रास्ताविकातून तसेच प्राचार्य मॅडमने अध्यक्ष भाषणातून आहार विषयक जागरूकता निर्माण केली.
सदर स्पर्धेत .शोभा बिंगेवार इंदिरानगर यांच्या फोर्टीफाईट ‘तांदळाचे पापड,चकली’ह्या पाककृती प्रथम,अस्मिता कोलते* सिंदेवाही यांच्या’चना पुलाव’पाककृतीस द्वितीय,तर. *मीना दीपक बोरकर* वासेरा यांच्या “नाचणीचे मोदक” पाककृती तृतीय क्रमांक देऊन 3 पंचांच्या सहमतीने निवड करण्यात आली.विजेत्या स्पर्धकांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.
स्पर्धा कार्यक्रमाचे संचालन शिक्षक मा‌.किशोर कावळे तर आभार प्रदर्शन केंद्रप्रमुख मा.रमेश रामटेके सर यांनी केले.स्पर्धा कार्यक्रम यशस्वीतेसाठी”सर्वोदय कन्या विद्यालय सिंदेवाही”च्या विद्यार्थिनींनी उत्तम सहकार्य केले.विजयी झालेल्या तिन्ही स्पर्धकांना शासनाकडून बक्षीस मिळणार असल्याचे घोषित करून स्पर्धा उपक्रमाचा समारोप करण्यात आला.