मालक कामानिमित्त दुबईला गेल्याची संधी साधून तिघांनी त्याच्या घरातील मुद्देमालावर हात साफ केला.

51

मालक कामानिमित्त दुबईला गेल्याची संधी साधून तिघांनी त्याच्या घरातील मुद्देमालावर हात साफ केला.

त्रिशा राऊत नागपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी मो 9096818953

नागपूर : आपल्या मालकाकडे चोरी करून रेल्वेने पळून जाणाऱ्या चोरट्यांना नागपूर आरपीएफच्या गुन्हे शाखेने तेलंगणा एक्सप्रेसमध्ये नागपूर जिल्ह्यातील काटोलजवळ ताब्यात घेतले.त्यांच्याकडून दागिने व रोकड असा सुमारे दीड कोटींचा मुद्देमाल आणि विविध देशांचे चलन जप्त करण्यात आले. सुशील सुरत मुखिया (वय २९) मलाही सोनी (वय ३८, रा. मधुबनी बिहार, वसंती आर्या, ४५ पश्चिम बंगाल) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

हैदराबादमध्ये हे तिन्ही आरोपी एका व्यावसायिकाकडे काम करीत होते. मालक कामानिमित्त दुबईला गेल्याची संधी साधून तिघांनी त्याच्या घरातील मुद्देमालावर हात साफ केला. हिरे मोती, सोन्याचे दागिन्यासह रोख रक्कम, परदेशी चलन बागेत भरून पोबारा केला. तेलंगणा एक्सप्रेसने हे चोरटे पळून गेले. घरातील इतरांना चोरी झाल्याचे कळताच त्यांनी नारायण गुंडा पोलिसांना कळविले.

पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे फिरवली विविध मार्गावरील आरपीएफला वर्णन व छायाचित्र पाठविली. आरोपी बिहारचे असल्याने नागपूरमार्गे जाऊ शकतात याविषयीची सूचना देण्यात आली. नागपूर आरपीएफ गुन्हे शाखेचे नवीन प्रताप सिंग व अजय सिकरवार यांनी तेलंगणा एक्सप्रेसमध्ये या वर्णनावरून काटोल येथे एका महिलेसह तीनही आरोपींना ताब्यात घेतले.