महाविकास आघाडीचा घटक पक्षाकडून दगा शेकाप नेते जयंत पाटील यांचा गंभीर आरोप

54

महाविकास आघाडीचा घटक पक्षाकडून दगा
शेकाप नेते जयंत पाटील यांचा गंभीर आरोप
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:-विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी दगाबाजी केल्याचा गंभीर आरोप शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केला. मित्र पक्ष आणि आघाडीने दगा दिला नसता तर जिल्हा शेकापचे चार आमदार असते. परंतु आपल्याला त्यावर भाष्य करायचे नाही असेही ते म्हणाले. लोकसभेत इंडिया आघाडीच्या यशात डाव्या पक्षाचा सिंहाचा वाटा असल्याचा दावाही त्यांनी केला.
शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने सरचिटणीस जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली चार दिवसांच्या जिल्हा संवाद मेळावा दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या संवाद दौऱ्याचा समारोप मंगळवारी अलिबागेत झाला. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की आपण इंडिया आघाडी सोबतच आहोत. लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीच्या ज्या 32 जागा आल्या त्या डाव्या पक्षाचा सिंहाचा वाटा आहे. 17 जागा डाव्या पक्षामुळे आल्या.
हे सांगताना जयंत पाटलांनी काही जागांची उदाहरणे दिली. मात्र विधानसभा निवडणुकीच्या वेळी हे तत्व पाळले गेले नाही. आम्ही केवळ 15 जागा मागितल्या होत्या. आता ते आपली चूक कबूल करत आहेत असेही पाटील यांनी भाषणात सांगितले.
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पाटील म्हणाले की यापुढे आपल्या जिद्दीने काम करायचं आहे. जे गद्दार आहे त्यांना बाजूला करायचे आहे. आपण पक्ष संघटनेत बदल करत आहात. तरुणांना जास्तीत जास्त संधी द्यायची आहे. महत्त्वाचे म्हणजे आज 50 टक्के महिला असणार आहेत. या कार्यकर्त्यांनी पक्षासाठी वेळ दिला पाहिजे अभ्यास केला पाहिजे. पक्षात काम करणाऱ्या नवीन पिढीचे त्यांनी कौतुक केले. कोणतीही साधनसामग्री नसताना दत्ता पाटील प्रभाकर पाटील आणि त्यानंतर आम्ही काम केले. आज साधने उपलब्ध असल्यामुळे अधिक चांगले काम करण्याची संधी असल्याचे जयंत पाटील म्हणाले. सरकारी कार्यालय ही दलालाची कार्यालय झाल्याचा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले की यश मिळवायचे असेल तर सरकारी यंत्रणावर आपला वचक असला पाहिजे. यापुढे आक्रमक वाटचाल करत काम करायचे आहे. जिल्हा राज्यस्तरावर मेळावे घेऊन नवी कार्यकर्त्यांना पूर्वी देण्याचे काम केले जाईल. महिलांची युवकांची आघाडी प्रभावी करायची आहे.
झालेल्या चुका सुधारून कामाला लागा असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. या मेळाव्यात राज्य महिला आघाडीच्या प्रमुख ॲड .मानसी म्हात्रे, जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, ॲड .गौतम पाटील, अतुल म्हात्रे यांचीही समयोचित भाषणे झाली. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार बाळाराम पाटील, द्वारकानाथ नाईक, शंकर म्हात्रे, अलिबागच्या माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, प्रदीप नाईक, जिल्हा परिषदेच्या माझे अध्यक्षा सुप्रिया पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. अलिबाग तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हा संवाद मिळाला हजेरी लावली.

चौकट
*ही तर लोकशाहीची थट्टा*
शेतकरी कामगार पक्ष महाविकास आघाडी बरोबरच आहे. इंडिया आघाडीचे नेते शरद पवार यांच्याशी आमची चर्चा सुरू आहे. निवडणुकीत नेमके काय झाले हे सर्वांना कळले आहे. आघाडीमध्ये सुधारणा होईल अशी अपेक्षा शेकाप नेते सरचिटणीस जयंत पाटील यांनी व्यक्त केली. निवडणूक आहे कधी होतील होतील की नाही हे आम्हाला माहीत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका रखडल्या आहेत. एक व्यक्ती कारभार पाहते ही काही लोकशाही ही लोकशाहीची थट्टा असल्याची भावना जयंत पाटील यांनी व्यक्त केली.