नागपूर महानगरपालिका आणि Green Vigil Foundation च्या वतीने राम नगर चौक येथे पौर्णिमा दिवस’ साजरा

66

नागपूर महानगरपालिका आणि Green Vigil Foundation च्या वतीने राम नगर चौक येथे पौर्णिमा दिवस’ साजरा

✍🏻मंजुषा सहारे ✍🏻
नागपूर शहर प्रतिनिधी
मो 9373959098

नागपूर :- सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे आहे की नागपूर महानगरपालिका आणि Green Vigil Foundation च्या वतीने राम नगर चौक येथे पौर्णिमा दिवस’ साजरा करण्यात आला. माजी आमदार MLC Prof. Anil Sole यांनी महापौरपदी असताना या अभियानाची संकल्पना मांडली होती. राम नगर चौकात श्री. अनिल सोले यांनी स्वतः उपस्थित राहून ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांना प्रोत्साहित केले. ग्रीन व्हिजीलचे कौस्तव चॅटर्जी, सुरभी जयस्वाल, मेहुल कोसुरकर, बिष्णुदेव यादव, प्रिया यादव, श्रिया जोगे, पिनाकी बनिक, प्रतिक इसमपेल्लीवार आदींनी जनजागृती केली. त्यांना मनपाचे सुनील नवघरे व आशिष इंगळे यांचे सहकार्य लाभले. यावेळी स्वयंसेवकांनी व्यापारी बांधवांना अनावश्यक विद्युत दिवे बंद करण्याचे आवाहन केले त्याला नागरिकांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला.