ध्वजस्तंभ सजावट स्पर्धेत चौलसराई शाळा प्रथम

87

ध्वजस्तंभ सजावट स्पर्धेत चौलसराई शाळा प्रथम

आंदोशी केंद्र तर्फे स्पर्धेचे आयोजन
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग :-भारताच्या ७६व्या प्रजासत्ताक दिना निमित्त व घर घर संविधान कार्यक्रम निमित्त
ध्वजस्तंभ सजावट स्पर्धा आंदोशी केंद्र तर्फे कृष्णकुमार
यशवंत शेळके केंद्रप्रमुख आंदोशी यांनी आयोजित केली होती.
या स्पर्धे मध्ये बेलोशी,
चिंचोटी, वळवली,आंदोशी,चौलसराई,वावे,महाजने,दिवीवाडी,बेलोशीवाडी,आंबेपूर सराई,घोटवडे येथील शाळांनी सहभाग घेतला होता.या शाळा मधून आकर्षक ध्वज सजावटीचे प्रथम क्रमांकचे बक्षीस १००१रुपये चौलसराई शाळेने मिळविले, द्वितीय क्रमांक ७०१रुपये चे बक्षीस वावे डिवाईन स्कुल ने तर तृतीय क्रमांक ५०१चेबक्षीस शाळाआंदोशी ने मिळविले .
या स्पर्धेचे बक्षिस वितरण घोटवडे येथे माहे 14फेब्रुवारीच्या शिक्षण परिषदेत करण्यात आला.
ध्वजस्तंभ सजावट स्पर्धा तील विजयी शाळांना घोटवडे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ.सौम्या समीर ठाकूर यांच्याहस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. या वेळी सर्व शाळेतील मुख्याध्यापक,शिक्षक उपस्थित होते.