हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती बुधवार १९ फेब्रुवारी रोजी साजरी करणार

64

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती बुधवार १९ फेब्रुवारी रोजी साजरी करणार

✍🏻मंजुषा सहारे ✍🏻
नागपूर शहर प्रतिनिधी
मो 9373959098

नागपूर :- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती बुधवार १९ फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणार आहे. केंद्र व राज्य शासनाकडून प्राप्त निर्देशांच्या अनुषंगाने मनपा मुख्यालय, सिव्हिल लाईन्स येथून सकाळी 7 वाजता शहरात ‘जय शिवाजी – जय भारत’ पदयात्रा काढण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या तयारीचा मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी शुक्रवारी (ता.१४) आढावा घेतला. मनपा आयुक्त सभाकक्षातील बैठकीत अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल, अतिरिक्त आयुक्त श्री. अजय चारठाणकर, मुख्य अभियंता श्रीमती लीना उपाध्ये, उपायुक्त श्रीमती विजया बनकर, डॉ. रंजना लाडे, उपायुक्त सर्वश्री विजय देशमुख, मिलींद मेश्राम, प्रकाश वराडे, अशोक गराटे, अधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवार, परिवहन व्यवस्थापक श्री. विनोद जाधव, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, सहायक आयुक्त सर्वश्री श्याम कापसे, हरीश राउत, घनश्याम पंधरे, विकास रायबोले, प्रमोद वानखेडे, नरेंद्र बावनकर, विजय थुल, धनंजय जाधव, मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. बी.पी. चंदनखेडे व कार्यकारी अभियंता व इतर अधिकारी उपस्थित होते.