मिळकतखार भरावाच्या एफ.आय.आर. मध्ये जे.एस.डब्ल्यू, पार्थ कंस्ट्रक्शन व ट्रक मालक यांना सह आरोपी करा.

62

मिळकतखार भरावाच्या एफ.आय.आर. मध्ये
जे.एस.डब्ल्यू, पार्थ कंस्ट्रक्शन व ट्रक मालक
यांना सह आरोपी करा.

ग्रामस्थांचे पोलिस अधीक्षकांना निवेदन.

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- मांडवा सागरी पो.स्टे मधील एफ.आय.आर. क्र.०२/२०२५ नुसार मिळकतखार येथे कांदळवन क्षेत्र व सी.आर.झेड मध्ये बेकायदेशीर ची जे. एस.डब्ल्यू स्लॅग माती/मुरुम भराव केल्याबाबतच्या गुन्हयामध्ये ठेकेदार पार्थ कंस्ट्रक्शन कनकेश्वर फाटा, पो. नवगाव, ता. अलिबाग व स्लेंग बेकायदा पुरवठा करणारी कंपनी जे.एस.डब्ल्यू यांना सह आरोपी करावे असे लेखी निवेदन ग्रामस्थांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिले आहे.

मौजे मिळकतखार, ता. अलिबाग, जि.रायगड येथे कांदळवन व सी.आर.झेड. तसेच एन.डी. झेड क्षेत्रामध्ये बेकायदा जे.एस.डब्ल्यु स्लॅग व माती/मुरुम भराव केल्याबाबत मे. वासवाणी कंपनी विरुध्द सन २०१४, २०२२ व २०२५ मध्ये मांडवा सागरी पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल आहेत.

सध्या मांडवा सागरी पोलीस स्टेशन एफ.आय.आर. ०२/२०२५ मध्ये दाखल एफ.आय.आर मध्ये हा कायदेशीर भराव मालक वरुण गोविंद वासवणी व इतर यांच्या दि . १४ नोव्हेंबर २०२४ वर्क ऑर्डरवरुन पार्थ कंस्ट्रक्शन चे मालक जितेंद्र जयराम बेर्डे रा. कनकेश्वर फाटा, ता.अलिबाग, करत आहेत हे माहिती अधिकारात प्राप्त कागदपत्रावरुन दिसून आले आहे. तसेच याच एफ. आय. आर मध्ये तक्रारदार महाराष्ट्रशासन तर्फे मंडळ अधिकारी नलिनी पाटील यांनी सदर भरावाची स्लग जे.एम.डब्ल्यू कंपनीने पुरवली असल्याचा उल्लेख आहे. तसेच हा बेकायदेशीर भराय करण्यासाठी वापरण्यात आलेला ट्रक क्र. MH.06.AQ.1591 MH.43.BP.6393 तसेच JCB क्र. MH17.CX.0887 या वाहनांचा वापर केल्याचा उल्लेख तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी अलिबाग यांना सादर केलेल्या अहवालामध्ये आहे. त्यामुळे या वाहनांच्या मालकांचा शोध होवून त्यांनाही या गुन्हयामध्ये सह आरोपी करण्यात यावे अशी विनंती ग्रामस्थांनी केल्याने भराव माफियांची पाचावर धारण बसली आहे.