करून रिक्शा चालवण्यानवर कधी होणार कारवाई, मुंबईकरांचा सवाल.

54

रात्रीच्या वेळी हेड लाईट बंद करून रिक्शा चालवण्यानवर कधी होणार कारवाई, मुंबईकरांचा सवाल.

✍️ पप्पू वि. नायर ✍️
मुंबई शहर प्रतिनिधी
📞7304654862 📞

मुंबई :- रात्रीच्या वेळी मुंबईच्या प्रत्येक रस्त्यांवर हेड लाईट बंद करून रिक्शा वाले वाहतूक करताना दिसून येते त्याच कारण अजून अस्पष्ट आहे. पण हे योग्य आहे कि अयोग्य आहे, हे जाणून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे ऍक्सीडेन्ट चे प्रमाण वाढत जात आहे.

एकतर रिक्षावाले एवढे बेशिस्तीने रिक्शा चालवत असतात कि त्याचा त्रास अन्य वाहननावर होतो, पॅसेंजर ने हात दाखविला कि लगेच ब्रेक लावून मागच्या फूडच्या चा विचार न करता मधेच थांबतात, डाव्या साईडने ओव्हर टेकिंग करणे, पसंतीचे भाडे, आशा अनेक तक्रारी ला दररोज मुंबईकरांना सामोरे जावे लागते.आता तर नवीन भाडे वाढ झाली असून त्यांचे दिवस सुगीचे झाले आहेत.

मुंबईत वाहतूक कोंडीचा पण जास्त फटका ऑटो वाल्यांमुळेच होत असतो. प्रत्येक सिग्नल व टूर्निंग च्या ठिकाणी उभे राहणे वाहतुकीस अडथळा निर्माण करणे अशा सर्व प्रकारच्या नियमांची पायमल्ली रिक्शा चालकांकडून होताना दिसून येते. त्यात शोधावं गेल्यास अर्धे रिक्शा वाले अवैध परमिट, विना बॅच लायसन्स, नसताना रस्त्यांवर धावताना दिसून येते. मुंबईकरांच्या वैयक्तिक वाहननावर ट्रॅफिक पोलीस कारवाई करतात, परंतु सर्व वाहतुकीची डोकेदुखी ठरत असलेल्या रिक्शा वाल्यांवर कधी कारवाई होणार असा संतप्त सवाल मुंबईकर परिवहन विभागाला करत आहे.

मुंबई मधे हजारो लाखो लोकं रस्त्यानवरून प्रवास व अन्य लोकं पायी प्रवास करत असतात, त्यात रात्रीच्या वेळी जर रोड क्रॉस करणं झालं तर नागरिकांना जीव मुठीत धरून रस्ता क्रॉस करायला लागतो. कारण हेड लाईट बंद करून येणारे रिक्षावाल्यांपासून सावधानतेने त्यांना रोड क्रॉस करावं लागत, अपघात होऊ नये म्हणून त्याची जवाबदारी वेळोवेळी मुंबईकरणाच घ्यावी लागते.
पण परिवहन मंडळाला त्याची थोडी सुद्धा शरम राहिली नाही. परिवहन मंडळानी जर रिक्शा वाल्यांवर कारवाई केल्यास लाखोंचा महसूल दंडाच्या स्वरूपात गोळा होऊ शकतो. असे मुंबईकरांचे म्हणणे आहे.

सदर परिवहन आर. टी. ओ. यांच्या माध्यमातून रिक्शा वाल्यांवर लवकरात लवकर कारवाई करून, या पुढे रात्रीच्या वेळी हेड लाईट चालू ठेवूनच ऑटो चालवण्याचे निर्देश देण्यात यावे, व प्रवाशांना जिथे जायचे आहे तिथेच सोडावे, पसंदीचे भाडे, भाडे नाकारणे अशा विविध गोष्टींवर शिस्त लावण्यात यावी.