लालजी पाडा कांदिवली मधे चायनीस फूड मध्ये अवैध तळीरामांची भरते जत्रा,चिरीमिरी साठी पोलीस प्रशासन हतबल.

46

लालजी पाडा कांदिवली मधे चायनीस फूड मध्ये अवैध तळीरामांची भरते जत्रा,चिरीमिरी साठी पोलीस प्रशासन हतबल.

✍️ पप्पू वि. नायर ✍️
मुंबई शहर प्रतिनिधी
📞 7304654862 📞

मुंबई :- कांदिवली लालजी पाडा लिंक रोड वर लाईनीत पाच – सहा चायनीस फूड स्टॉल असून, तिथे सकाळी अकरा वाजल्या पासून ते रात्री बारा वाजल्यापर्यंत तळीरामांची अवैध पद्धतीने व्यवसाय चालू असतो, अक्षर्श जत्रा भरल्यासारखा स्वरूप दररोज पाहवयास मिळतो.असंच जर चित्र चालू राहिल्यास गुन्हेगारी वाढायला वेळ लागणार नाही.

तेथील चायनीस फूड मालकांना सवाल केल्यास, आश्चर्य चकीत होण्यासारखं उत्तर ऐकायला मिळतं. त्यांच म्हणणं असे आहे कि, जर दारू पिण्यास नाही दिले तर आमचं व्यवसाय चालणार नाही, जर एक मधपी प्यायला बसल्यावर त्याचे कमीतकमी दोनशे ते तीनशे रुपये होतात, त्यांचं पण काम होतो आणि आमचं पण तसेच त्यांना बार मधे बसून प्यायला महागात पडते, म्हणून ते चायनीस ला पसंद करतात, कारण इथे कमी पैशात चांगल चकन्याला मिळतं. मग पोलिसांच काय असे विचारणा केल्यास, धक्कादायक माहिती समोर आली, आम्ही त्यांना हफ्त्या स्वरूपात ठराविक रक्कम देतो. त्यामुळे आम्हाला कसलाच त्रास पोलीस प्रशासनाकडून होत नाही.

धन्य आहेत ते कांदिवली मधले पोलीस, जर अशा छोट्या – मोठ्या अवैध धंदेवाल्यांकडून चिरीमिरी घेत असतील तर, अवैध धंदेवाले पूर्ण मुंबईत फोफवण्यास वेळ लागणार नाही, व गुन्हेगारी वाढत राहणार.

सदर कांदिवली पोलिसांचा पर्दा फाश तेथील चायनीस स्टॉल च्या मालकांनीच केली हे उघड झाले असून, आता सर्व प्रकार त्या विभागाचे एस पी साहेबांना एक प्रत व, मुंबई पोलीस आयुक्त साहेबांना एक प्रत देऊन तिसरी प्रत गृहमंत्रालयाला देण्यात येणार असून, त्यांच्याकडून आम्हाला आशा आहे कि असल्या लाचखोर पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई तुमच्या माध्यमातून व्हावी अशी आपणास विनंती, व सदर अवैध चायनीस धारकांवर ही तेवढीच कडक कारवाई कराल, आणि ते धंदे कायमचे बंद कराल, अशी कांदिवलीकर व समाजसेवक नात्याने आपणास विनंती राहिल. जर नाही झालं तर आम्हांला नाईलाजाने आंदोलन करावं लागेल, तरी ही वेळ तुम्ही आमच्यावर नाही आणणार ही नम्र विनंती.