अट्टल गुन्हेगारास चार महिन्यांकरिता हद्दपार करण्यात आले.
त्रिशा राऊत
क्राईम रिपोटर नागपुर जिल्हा प्रतिनिधि .मो 9096817953
भिवापूर :- भिवापूर.गावातील शांततेस बाधा ठरलेल्या कारगाव येथील अट्टल गुन्हेगारास चार महिन्यांकरिता हद्दपार करण्यात आले. जयकमल मधूकर वारजूरकर असे हद्दपार करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्यावर दारूशी संबंधीत विवीध गुन्ह्याची पोलिसांत नोंद आहे उमरेड येथील उपविभागीय अधिकारी विद्यासागर चव्हान यांनी त्याच्या हद्दपारीचे आदेश निर्गमीत केले त्यानुसार आरोपीस नागपूर शहर व जिल्ह्यात पुढील चार महिन्यांपर्यंत राहण्यास मनाई करण्यात आली असल्याची माहिती ठाणेदार जयप्रकाश निर्मल यांनी आज १७फरवरी सोमवारला दुपारी तीन वाजता प्रतिनिधीशी बोलतांना दिली आहे ठाणेदार जयप्रकाश निर्मल यांनी २ ऑक्टोबर २०२४ला त्याच्या हद्दपारीचा प्रस्ताव दाखल केला होता त्याच्यावरील कारवाईमुळे गुंडगिरी प्रवृतीच्या मंडळीत खळबळ उडाली असून त्यांचे ढाबे दणाणले असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.