आ सिध्दार्थ खरात यांचे प्रयत्न फळाला ; अखेर बाराव्या दिवशी पेनटाकळी ग्रामस्थांचे उपोषण सुटले
नवीन पुर्नवसनाची अद्यावत वस्ती उभी राहणार : आ. सिध्दार्थ खरात
✍️अनिता हातेकर✍️
संग्रामपूर तालुका प्रतिनिधी
मो8459775380
संग्रामपूर मेहकर : – पेनटाकळी पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेऊन आमदार सिध्दार्थ खरात यांनी पेनटाकळी पुर्नवसनाचा प्रश्न ऐरणीवर आणला. त्यानंतर उपोषणकर्त्यांच्या तब्बल १२ दिवसांच्या उपोषणात त्यांनी सातत्याने भेटी देवून जिल्हाधिकारी कार्यालयात महत्वपूर्ण बैठक घेतली होती. त्यानंतर दिलेल्या आश्वसनानंतर सोमवार १७ फेब्रुवारी रोजी आमदार सिध्दार्थ खरात यांच्या पाठपुराव्यामुळे पेनटाकळी पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. लवकारात लवकर पेनटाकळीला नवीन पुनर्वसनाची अद्यावत वस्ती उभी राहणार असल्याची ग्वाही आ. सिध्दार्थ खरात यांनी पेनटाकळी ग्रामस्थांना दिली आहे.
पेनटाकळी धरणात उपोषण करत असलेल्या ग्रामस्थांच्या उपोषणाची सांगता सोमवार १७ फेब्रुवारी रोजी केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव, मेहकर विधानसभा मतदार संघाचे आमदार सिध्दार्थ खरात यांच्या हस्ते करण्यात आली. त्यांनंतर गावकऱ्यांनी आनंद साजरा केला. यावेळी माजी आमदार डॉ संजय रायमुलकर, जिल्हा परिषद सदस्य संजयभाऊ वडतकर, योगेश कंकाळ यांची उपस्थिती होती.
पेनटाकळी ता.मेहकर येथील ग्रामस्थ गेल्या ३५ वर्षांपासून पेनटाकळी नवीन गावठाण पुनर्वसना पासून वंचित होते. त्यांचे पुनर्वसन व्हावे ही मागणी सातत्याने होत होती. आमदार सिध्दार्थ खरात यांनी विधानसभा निवडणूकी दरम्यान ग्रामस्थांना पुनर्वसनाचा प्रश्न सोडवण्याचे आश्वसान दिले होते. त्यानंतर आता ग्रामस्थांचे ३८१ प्लॉट अधिकृत करण्यात आले आहे. तसेच अतिक्रमण काढण्याची कायदेशीर कारवाई पूर्ण होणार असल्याने आमदार सिध्दार्थ खरात यांचे प्रयत्न फळाला आले आहे, हे विशेष..!
पेनटाकळीवर योजनांचा पाऊस पाडणार
पेनटाकळी पुनर्वसनाचा प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामस्थांनी स्वत: पुढाकार घेतला हे दखलपात्र आहे. आता नाही तर केव्हाच नाही हा ठाम निर्धार पुनर्वसनाचा प्रश्न सोडवून गेला आहे. आगामी काळात विविध योजनांच्या माध्यमातून पेनटाकळीचा कायपालट करण्यासाठी योजनांचा पाऊस पाडणार असल्याचेही आमदार सिध्दार्थ खरात यांनी सांगितले