मेहकर नगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवरायांना अभिवादन…

43

मेहकर नगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवरायांना अभिवादन…

शिवाजी राजांचा राज्यकारभार पारदर्शक होता : आ. सिद्धार्थ खरात

✍️अनिता हातेकर✍️
संग्रामपूर तालुका प्रतिनिधी
मो 8459775380

संग्रामपूर :- सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे मेहकर: शेतकऱ्यांच्या गवताच्या काडीची देखील अभिलाषा बाळगू नका,अश्या सक्त सूचना देऊन छत्रपती शिवाजीराजांनी आपल्या राज्यात लाचखोरीला पायबंद घातला. शिवाजी राजांचा राज्यकारभार अत्यंत स्वच्छ आणि पारदर्शक होता. त्यांच्या राज्यात भ्रष्टाचाराला थारा नव्हता, शिवरायांच्या राज्यकारभाराचे केंद्र व राज्य सरकारने अनुकरण करावे
असे मत मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी व्यक्त केले.

नगरपालिकेच्या वतीने शिवाजी उद्यान येथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. यावेळी आमदार सिद्धार्थ खरात बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, छत्रपती शिवराय स्वाभिमानासाठी, स्वराज्यसाठी लढले.त्याचप्रमाणे आता आपल्याला शेतकरी ,बेरोजगांच्या प्रश्नांसाठी लढावे लागणार असल्याचेही ते म्हणाले. शिवाय१९ फेब्रुवारी लाच छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखे नुसारच साजरी करण्यात यावी, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी प्रशासक तथा मुख्याधिकारी रामराजे कापरे,कार्यालय अधीक्षक अजय चैताणे, बांधकाम अभियंता किशोर ढेपले, आरोग्य निरीक्षक संजय गिरी, संगणक अभियंता जैवाळ, अनिता कळसकर, सहायक प्रकल्प अधिकारी रमेश उत्तरे ,अनिल मुळे, विशाल शिरपूरकर, प्रकाश सौभाग्य, विलास दाभाडे, विलास जवंजाळ, गजानन कुऱ्हालश रामेश्वर बचाटे,आनंद जमदार ,विजू कटारे व नपचे सर्व कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.

शिवसेना पक्ष कार्यालयात छत्रपती शिवरायांना अभिवादन

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्ष कार्यालय जानेफळ रोड मेहकर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले यावेळी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे लोकप्रिय आमदार सिद्धार्थ खरात ,उपजिल्हा प्रमुख आशिष रहाटे, तालुका प्रमुख ऍड.आकाश घोडे, मेहकर शहर अध्यक्ष किशोरभाऊ गारोळे,ॲड संदिप गवई,संदीप गारोळे, परमेश्वर दहातोंडे,अमोल बोरे,श्याम पाटील,गोपाल गायकवाड, रविभाऊ गिरी,योगेश कंकाळ,ऋषिकेश जगताप, सचिन राऊत,स्वप्नील राऊत, शुभम पानखेडे, अमोल मोरे, रोहन जाधव यांची उपस्थिती होती.