वनविभाग सिंदेवाही च्या वतीने आग, संरक्षण तथा मानव वन्यजीव संघर्ष कार्यशाळा संपन्न

30

वनविभाग सिंदेवाही च्या वतीने आग, संरक्षण तथा मानव वन्यजीव संघर्ष कार्यशाळा संपन्न
जितेंद्र नागदेवते
सिंदेवाही तालुका प्रतिनिधी 8806689909

ब्रम्हपुरी :-ब्रम्हपुरी वनविभाग तर्फे विभागीय स्तरीय “आग व संरक्षण तथा मानव वन्यजीव संघर्ष कार्यशाळा” वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादे.) सिंदेवाही येथे आयोजीत करण्यात आली. सदर कार्यशाळेमध्ये वनवणवा, वन व वन्यजीव संरक्षण, तसेच मानव-वन्यजीव संघर्ष विषयाबाबत कार्यशाळेत उपस्थित मार्गदर्शकांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. डॉ. महेश गायकवाड, सहाय्यक वनसंरक्षक, (तेंदू) ब्रम्हपुरी वनविभाग, ब्रम्हपुरी यांनी उपस्थिती दर्शविली. त्याचप्रमाणे प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून विशाल सालकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, सिंदेवाही, यश कायरकर, अध्यक्ष स्वॅब नेचर फॉन्डेशन (NGO),. प्रा. हरिभाऊ पाथोडे, सर, राज्य संघटक, अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मुल समिती, योगश पाटील लोंढे, अध्यक्ष, पोलीस पाटील संघटना, ता. सिंदेवाही, नरेश गहाणे, जिल्हा अध्यक्ष पोलीस पाटील संघटना, लक्ष्मीकांत कामतवार अध्यक्ष संयुक्त वनव्यवस्थापन समिती, गुंजेवाही तथा अध्यक्ष सिंदेवाही तालुका पत्रकार संघ सिंदेवाही , विशेष अतिथी व मार्गदर्शक म्हणून राम शेंडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, दक्षिण ब्रम्हपुरी, सचिन नरड, वनपरिक्षेत्र अधिकारी, उत्तर ब्रम्हपुरी, किशोर देऊरकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, चिमुर, यांची उपस्थिती होती. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितीन गडपायले, क्षेत्र सहाय्यक, सिंदेवाही यांनी तर आभार प्रदर्शन श्री. एन. डब्ल्यु. बुराडे, क्षेत्र सहाय्यक, तांबेगडी मेंढा यांनी केले. कार्यकमाचे संचालन चांगदेव चिंचोलकर, वनरक्षक,l आर.आर.यु. सिंदेवाही यांनी केले.

कार्यक्रमात मार्गदर्शकांनी उपस्थितांना वनवणवा कारणे, वनव्याचे प्रकार, वनव्यापासुन होणारे नुकसान, वनवणवा संरक्षण प्रतिबंधात्मक व उपचारात्मक उपाय-योजना, वनवणवा संबंधी कायदेशीर तरतुदी, मानव-वन्यजीव संघर्ष व सहजीवन याबाबत विस्तृत व सखोल असे मार्गदर्शन करून उपस्थितांच्या शंका-समस्याचे निरसन केले.

सदर कार्यक्रमात सिंदेवाही तालुक्यातील पोलीस पाटील, सरपंच व ग्रामपंचायत पदाधिकारी, संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व पदाधिकारी, सामुहिक वनहक्क समितीचे अध्यक्ष व पदाधिकारी, सिंदेवाही परिक्षेत्रातील PRT सदस्य, स्वेंब नेचर फॉन्डेशनचे सदस्य, विविध समित्यांचे प्रतिनिधी, सिंदेवाही वनपरिक्षेत्र व सर्व वनपाल/वनरक्षक / कर्मचारी, अग्नीरक्षक, सर्व हंगामी मजुर कु. वर्षा धुर्वे, क्षेत्र सहाय्यक, सर्व वनपाल / वनरक्षक/कर्मचारी, वनविकास महामंडळ, सिंदेवाही इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते.