मुंबई-गोवा हायवेवर उभ्या असणाऱ्या ट्रेलरला मोटारसायकल स्वराची पाठीमागून जोरदार धडक
मोटारसायकल स्वार गंभीर जखमी
✍️तेजपाल जैन ✍️
कोलाड प्रतिनिधी
📞8928847695📞
मुंबई-गोवा हायवेवरील खांब गावानाजिक हायवेवरील रस्त्याच्या साईडपट्ट्याच्या खाली उभ्या असणाऱ्या ट्रेलरला मोटारसायकल स्वराने जोरदार धडक हा अपघात झाला या अपघातात मोटारसायकल स्वार गंभीर जखमी झाला आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार गुरुवार दि. २०/२/२०२५ रोजी रात्री २०.२० वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा हायवे वरुन पोस्को कंपनी विलेभागाड एमआयडीसी येथे जात असतांना मौजे खांब गावाच्या हद्दीत आल्यानंतर मुंबई-गोवा हायवे वर गोवा बाजुकडे जाणाऱ्या रस्त्याच्या साईडपट्टीच्याखाली ट्रेलर गाडी क्र.एम. एच. ४६/बी. एफ./५३३९ ही गाडी उभी केली असता पाठीमागून येणारी मोटार सायकलस्वार गाडी क्र एम. एच. २०/एफ. डी./१४८९ या मोटारसायकल स्वराने ट्रेलरला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला या अपघातात मोटारसायकलस्वार विराट तिवारी हा गंभीर जखमी झाला त्याला पुढील उपचारासाठी पनवेल येथील एम. जी. एम. हॉस्पिटल येथे हलविण्यात आले आहे याचा अधिक तपास सपोनि मोहिते कोलाड पोलीस ठाणे अतिरिक्त कार्यभार श्री
सपोनि सूर्यवंशी पाली पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा शिर्के करीत आहेत.