लक्ष्मीनगर झोपडपटटी भागातील महिला आणि युवतींना सॅनिटररी पॅडचे वितरण करुन आरोग्यविषयी जागृती वाढावी याविषयी कार्यक्रम आयोजित
✍🏻मंजुषा सहारे ✍🏻
नागपूर शहर प्रतिनिधी
मो 9373959098
नागपूर :- सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे स्वच्छता स्विकारा, आरोग्य आणि आत्मविश्वास वाढवा
लक्ष्मीनगर झोन मधील प्रभाग 37 मध्ये लक्ष्मीनगर झोपडपटटी भागातील महिला आणि युवतींना सॅनिटररी पॅडचे वितरण करुन आरोग्यविषयी जागृती वाढावी याविषयी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यात नागपूर महानरपालिका, रोटरी क्लब आणि वायसीसीईच्या सदस्यांनी सक्रीय भूमीका पार पाडली.
कार्यक्रमाचे उदेदश
मासिक पाळी स्वच्छतेचे महत्व समाजावून सांगणे
सॅनिटरी पॅडचे योग्य उपयोग आणि त्याचे विल्हेवाटची माहिती देणे
महिला आणि युवतींना स्वस्थ आरोग्याच्या सवयीकरीता प्रेरीत करणे
काय करावे
सॅनिटरी पॅडचा उपयोग करावे
उपयोगानंतर पॅड ला कागदात गुंडाळून, लाल बिंदूचा चिन्ह लावावे आणि कचरा गाडीत लाल बिन मध्ये टाकावेत
याप्रकारे जनजागृतीतून मासिक पाळीशी विषयी चुकीच्या धारणा दूर करणे आणि महिला आरोग्य अधिक चांगले बनविण्यामध्ये महत्वपूर्ण भूमिका पार पाडते.