माणगांव तालुका आरोग्यसेवा संघटनेच्या अध्यक्ष पदी महेश पाटील यांची निवड

34

माणगांव तालुका आरोग्यसेवा संघटनेच्या अध्यक्ष पदी महेश पाटील यांची निवड

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:-आरोग्य सेवा संघटननेच्या जिल्हा बैठकीत माणगांव तालुका आरोग्यसेवा संघटनेच्या अध्यक्ष पदी महेश पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
दि. 22/2/2025 रोजी प्रा आ केंद्र गोरेगाव ता माणगाव येथे रा. जि. आरोग्य कर्मचारी संघटनेची सभा संपन्न झाली. सभेस तालुक्यातील सर्व आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यक, गोरेगाव येथील LHv श्रीम. मिंडे सिस्टर उपस्थित होते. सभेस जिल्हाध्यक्ष अमोलजी खैरनार व कोशाध्यक्ष गणेश शिरसाठ उपस्थित होते. रविंद्र मुदगुल, आरोग्य सहाय्यक नांदवी यांनी प्रास्ताविक केले. यावेळेस नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली. माणगाव तालुका अध्यक्ष म्हणून महेश उल्हास पाटील आरोग्य सहाय्यक निजामपूर यांची निवड करण्यात आली. सचिव पदी मुदगुल तर कोशाध्यक्ष पदी नवीन आरोग्यसेवक कृष्णा भोसले निजामपूर यांची निवड करण्यात आली. मा. अध्यक्ष यांनी सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर महेश पाटील यांनी सर्वांना संघटनेचे महत्व सांगितले व मार्गदर्शन केले. आरोग्य विस्तार अधिकारी आर. एस. आंब्रे, संघटनेचे सल्लागार म्हणूनही मार्गदर्शन केले. शेवटी मा. अध्यक्ष खैरनार यांनी सर्वांना आपले मोलाचे मार्गदर्शन केले. गणेश शिरसाठ यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सर्वांना शुभेच्छा दिल्या व सर्वांनी संघटनेशी एकरूप होऊन संघटना वाढीस कशी लागेल यासाठी प्रयत्न करा असे सांगून समारोप केला.