कचरा व्यवस्थापनाकरिता नवीन उपक्रम- स्वच्छतेकडे एक नवीन पाऊल

56

कचरा व्यवस्थापनाकरिता नवीन उपक्रम- स्वच्छतेकडे एक नवीन पाऊल

✍🏻मंजुषा सहारे ✍🏻
नागपूर शहर प्रतिनिधी
मो 9373959098

नागपूर :- सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे नागपूर महानगरपालिका, अवंतिका ग्रुप आणि रेड एफएमचे आरजे माहि यांनी धरमपेठ झोनमधील केटीनगर येथील नक्षत्र उद्यानात नागरीकांना ओला आणि सुका कचऱ्याची योग्य ओळख आणि कचरा विलगिकरणाकरिता प्रोत्साहित केले.

या अभियानात कचऱ्याचे योग्य वर्गीकरण आणि त्याची विल्हेवाट याबाबत माहिती देण्यात आली. ओला कचऱ्याचा उपयोग खत तयार करण्याकरिता केला जाऊ शकतो, तर सुका कचऱ्याचा पुनर्वापर करून परत उपयोगात आणले जाऊ शकते याविषयी नागरीकांना माहिती यावेळी देण्यात आली.