भिसी उमरेड मार्गाने अवैद्य रेतीचे वाहतूक

41

भिसी उमरेड मार्गाने अवैद्य रेतीचे वाहतूक

त्रिशा राऊत क्राईम रिपोर्टर नागपूर
मो 9096817953

भिवापूर:- .सालेभट्टी फाटा येथे पाठऱ्या रंगांचा टिप्पर भिसी कडून – उमरेड च्या दिशेने जात असतांना या रेतीची वाहतूक करणाऱ्या टिप्पर क्रमांक एमएच ४९ एटी ९०८०ची कागदपत्राची तपासणी केली असता त्याच्याकडे कोणताही परवाना आढळून आला नसून क्षमतेपेक्षा जास्त रेतीची वाहतूक करतांना आढळून आली. याबाबत भिवापूर पोलिसांनी टिप्पर चालक व मालक यांचेवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करीत २०,४०००० लक्ष रुपया चा मुद्देमाल जप्त केला आहे.

प्राप्त माहितीनुसार ड्रायव्हर विनोद पुरुषोत्तम तितरमारे वय (३४) रेती ची वाहतूक करण्याचा कसलाही परवाना नव्हता सदर रेती मौजा नांदेड घाटतालुका लाखांदूर जि. भंडारा येथील होती. सदर टिप्पर मध्ये क्षमतेपेक्षा जास्त ८ ब्रास रेती जास्त रेती होती. ४० हजार रुपये व टिप्पर क्रमांक एमएच ४९ एटी ९६९० यांची किंमतीचा असा एकूण २०४०००० मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मालक प्रणय विलास धनविजय राहणार कावरापेठ उमरेड जि. नागपूर होता.

सरकारी खनीज रेतीची चोरटी वाहतूक करतांना मिळून आल्याने कायदे शिररीत्या २० ४०००० रुपयाचा माल जप्त करण्यात येवून आरोपी डायव्हर, मालक यांचेवर विविध प्रतिबंधक कलम लावून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.