मोठ्या संखेने उपस्थित राहून
स्व.प्रमोद गोजे यांच्या पाथिवावर पुष्पहार अर्पण केले.
त्रिशा राऊत नागपुर क्राइम रिपोर्टर
मो 9096817953
भिवापूर. होमगार्ड समादेशक प्रमोद गोजे यांचे दि.२५ फरवरी हदयविकाराचा झटका आल्याने त्याचे सकाळी निधन झाले. त्याचे पार्थिव देह आशा हॉस्पीटल कामठी येथून दुपारी दोन वाजता आझाद चौकातील त्याचे राहत्या घरी आणण्यात आले. यावेळी स्वर्गीय प्रमोद गोजे कुटूंबिय व नातेवाईक तसेच होमगार्ड सैनिक व पोलिस विभागातील अधिकारी व पोलिस अमलंदार मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार संजय मेश्राम, माजी आमदार सुधीर पारवे यांनी भेट देत गोजे परिवाराचे सांत्वन करून प्रमोद गोजे यांच्या पाथिवावर पुष्पहार अर्पण केले. यावेळी स्मशान भुमी येथे शासकीय इतामात होमगार्डसैनिकांनी कंपनी कमांडर आर. एन अन्सारी यांच्या नेतृत्वात सलामी दिली. यावेळी ठाणेदार जयप्रकाश निर्मल यांनी प्रमोद गोजे यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी शोक सभे प्रसंगी आमदार संजय मेश्राम, शहर कॉग्रेस कमेटीचे अध्यक्ष दिलीप गुप्ता, ठाणेदार जयप्रकाश निर्मल, परिविक्षाधिन उपनिरीक्षक सुरेखा बिडकर, माजी नगराध्यक्ष लव जनबंधू, युवराज करनुके, नगरपंचायत कक्ष अधिकारी वाकचौरे, होमगार्ड केंद्र नायक राजकुमार मासुरकर, समादेशक अधिकारी नागपूर शहर खेमचंद मस्के, कंपनी कमांडर आर.एन अन्सारी, पत्रकार संघातील सदस्य, होमगार्ड सैनिक उपस्थित होते. शोक सभेचे संचालन अभय ठवकर यांनी केले. पोलिस अमलदार तसेच नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.