अलिबाग लायन्सच्या कामाचे जिल्हा प्रांतपाल यांचेकडून कौतुक
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- समाजसेवेचे व्रत अंगीकारलेल्या लायन्स क्लब ऑफ अलिबागच्या संचालक मंडळ सभेसाठी जिल्हा प्रांतपाल लायन एन आर परमेश्वरन आणि त्यांचे सहकाऱी पदाधिकारी यांनी मायक्रो ऑब्झर्व्हरसह भेट दिली. सन्मान हॉटेलच्या सभागृहात झालेल्या बैठकीत २०२४-२०२५या लायन वर्षाच्या कामांचा आढावा घेण्यात आला.अलिबाग क्लबचे प्रेसिडेंट लायन ॲड गौरी म्हात्रे, सेक्रेटरी महेश कवळे, ट्रेझरर अंकिता म्हात्रे, फर्स्ट व्हीपी प्रदीप नाईक यांनी वर्षभरात केलेल्या विविध सेवा आणि उपक्रमांचा लेखाजोखा मान्यवर मायक्रो ऑब्झर्व्हरसमोर सादर केला. यावेळी विविध उपक्रमांसह गरीब आणि गरजूंच्या मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया, बहुचर्चित लायन्स फेस्टीवलचे यश, भव्य सायक्लोथॉन, वृक्षारोपण, आरोग्य शिबिरे, भूकेल्यांना अन्न,कपडे वाटप अशा विविध समाजोपयोगी उपक्रमांच्या यशस्वी आयोजनाने मान्यवरांनी समाधान व्यक्त करत, अलिबाग लायन्स हा आदर्श क्लब असल्याचे सूतोवाच करुन रेडी रेकनरमध्ये उत्तम नोंदी ठेवल्याबद्दल क्लबचे कौतुक केले. अलिबाग लायन्स क्लबच्या संचालक मंडळ सभेसाठी आणि त्यानंतरच्या सर्वसाधारण सभेसाठी जिल्हा प्रांतपाल यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांबरोबर उपस्थित राहून, अलिबाग लायन्स क्लबच्या कामकाजाची माहिती करून घेतली आणि केलेल्या कामाचे कौतुक केले . भविष्यातील अधिक चांगल्या कामाकरिता काही मौल्यवान सूचनासुद्धा दिल्या. लायन ॲड शिरीष लेले यांनी समस्त अलिबागकरांसाठी अभिमानाची बाब ठरलेल्या पीएमजेएफ लायन प्रवीण सरनाईक यांचा बीओडी मिटिंगमध्ये फर्स्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर पदासाठीचा ठराव मांडून एकमताने मंजूर केला.
यावेळी इतर प्रमुख उपस्थितांमध्ये फर्स्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर संजीव सूर्यवंशी, सेकंड डिस्ट्रिक्ट गव्हर्नर प्रवीण सरनाईक, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी उमंग देसाई,डिस्ट्रिक्ट ट्रेझरर सुशील गुप्ता , मल्टिपल ॲक्टिव्हिटी पर्सन, अमरचंद शर्मा,प्रिन्सिपल ॲडव्हायजर एस एन मूर्ती,विजय गणात्रा, रिजन चेअरपर्सन विजय वनगे,संजय गोडसे,रमाकांत म्हात्रे, गॅट कोऑर्डिनेटर अनिल म्हात्रे,पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर अनिल जाधव, नयन कवळे,नितीन अधिकारी, नमिता मिश्रा, विद्या अधिकारी, संजय पाटील, प्रियदर्शनी पाटील, अविनाश राऊळ,गिरीश म्हात्रे, महेंद्र पाटील, संतोष पाटील,परेश भतेजा, रोहन पाटील,भगवान मालपाणी,तुषार नाईक, डॉ रेखा म्हात्रे,अपर्णा पाटील, रमेश धनावडे, प्रकाश देशमुख, अतुल वर्तक,अभिजित आमले, श्रीकांत ओसवाल, कल्पेश थळे,अतुल कुलकर्णी, प्रकाश गुरव,अमोघ किंजवडेकर यांच्यासह बीओडी मेंबर्स आणि अलिबाग लायन्स सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.